Petrol and Diesel Price Today: भारतात दररोज, सरकारी तेल कंपन्या सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol and Diesel Price) जाहीर करतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे ही किंमत ठरवली जाते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींत बराच काळ कोणताही बदल झालेला नाही. गेल्या वेळी 21 मे रोजी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्पादन शुल्कात कपात केली होती. यानंतर देशात पेट्रोल आठ रुपयांनी तर डिझेल सहा रुपयांनी स्वस्त झाले. तेव्हापासून भारतातील इंधनाच्या दरांत कोणताही विशेष बदल झालेला नाही.

कच्च्या तेलाच्या किमती काय आहेत?

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवले जातात. कच्च्या तेलाबद्दल बोलायचे झाले तर सध्या त्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. WTI क्रूड ऑईल (WTI Crude Oil Price) च्या किमतीत 3.28 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे आणि ती प्रति बॅरल 73.39 डॉलरवर व्यवहार करत आहे. तसेच, ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत 2.71 टक्क्यांनी घसरली आहे आणि प्रति बॅरल 79.94 डॉलरच्या आसपास व्यवहार करत आहे. 

Petrol Diesel Price Today : देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

देशातील महानगरं पेट्रोल (प्रति लिटर) डिझेल (प्रति लिटर)
दिल्ली 96.72 रुपये 89.62 रुपये
मुंबई 106.31 रुपये 94.27 रुपये
कोलकाता 106.03 रुपये 92.76 रुपये
चेन्नई  102.63 रुपये 94.24 रुपये

Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर? 

  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  • पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
  • कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  • औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर 
  • परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
  • नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा

राज्यस्तरीय करांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर राज्यानुसार बदलतात. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल.

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).