Petrol-Diesel Price Today: भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळतेय, गेल्या 6 दिवसांत गुंतवणूकदारांचे तब्बल 20 लाख कोटी रुपये बुडाले असल्याची माहिती मिळतेय. अशातच याचा परिणाम देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांवरही होणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे. अशातच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशातील पेट्रोल-डिझेलचे दरही बदलणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आज देशात पेट्रोल-डिझेलच्या दरांत (Petrol Diesel Price) कोणताही बदल झालेला नाही.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या (Crude Oil Prices) किमतींत मोठी घसरण होत आहे. शेवटच्या ट्रेडिंग सत्राबद्दल बोलायचं तर ब्रेंट आणि क्रूड ऑईलमध्ये सुमारे 2 टक्क्यांची मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. पण देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. 27 ऑक्टोबरलाही पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थेच आहेत. 27 ऑक्टोबरलाही पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थेच होते. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये शेवटचा बदल 22 मे 2022 रोजी झाला होता आणि तेव्हापासून आतापर्यंत तेलाच्या किमतींत कोणताही बदल झालेला नाही.
22 मे 2022 पासून किमती स्थिरच
22 मे 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल केलेला नाही. काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत किंचित वाढ झाली असली तरी राज्य सरकारांनी व्हॅटमध्ये वाढ केली आहे.
देशातील महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर काय?
- दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर (Delhi Petrol Diesel Price)
- मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर (Mumbai Petrol Diesel Price)
- कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर (Kolkata Petrol Diesel Price)
- चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर (Chennai Petrol Diesel Price)
देशातील तेल विपणन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सारख्या कंपन्या त्यांच्या वेबसाईटवर पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. तुम्ही घरी बसूनही तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचे तपशील तपासू शकता.
Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).