Petrol-Diesel Price Today, April 26: भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. सर्व महानगरांमध्ये वाहनांच्या इंधनाचे दर सारखेच आहेत. 21 मे पासून राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. देशात काही राज्यांतील काही शहरांमध्ये मात्र पेट्रोल (Petrol)-डिझेलच्या दरांत (Diesel) किरकोळ बदल होत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. WTI क्रूड (WTI Crude Oil) 0.32 डॉलर ते 0.42 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 77.39 डॉलरवर व्यापार करत आहे. तसेच, ब्रेंट क्रूड 0.23 डॉलर ते 0.28 टक्क्यांच्या वाढीसह 81 डॉलरवर व्यापार करत आहे. 


IOCL नुसार, आजही देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे. देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल पोर्ट ब्लेअरमध्ये विकलं जात आहे. जिथे पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर आहे.


इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ची अधिकृत वेबसाईट iocl.com च्या नव्या अपडेट्सनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे.चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 102.63 रुपये आणि डिझेलची किंमत 94.24 रुपये प्रति लिटर आहे. तसेच, कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय  राज्य स्तरावर पेट्रोलवर लावण्यात आलेल्या करामुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही भिन्न असतात.


आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय? 



  • दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर 

  • मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

  • कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर


Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या


इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).