Petrol-Diesel Price Today: देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) नव्या किंमती जाहीर केल्या जातात. देशातील तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर करतात. दररोज सकाळी 6 वाजता देशातील तेल कंपन्या (OMCs) त्यांच्या वेबसाईटवर पेट्रोल आणि डिझेलच्या नव्या किंमती अपडेट केल्या जातात. आजपासून जून महिना सुरू झाला असून गेल्या 1 वर्षापासून कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल केलेला नाही. OMC नं 1 जूनसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. 1 जून रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिरच असून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 


पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय? 


1 जूनसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. 1 जूनपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत बदल झालेला नाही. सर्वसामान्यांना यापुढेही पेट्रोल आणि डिझेल त्याच दरांत घ्यावं लागणार आहे. देशातील महानगरं, दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नईसह सर्वच मोठ्या शहरांत पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. तर काही शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांत किरकोळ बदल झाला आहे. 


मे 2022 पासून राष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलच्या दरांत (Petrol-Diesel Prices) कोणताही बदल झालेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. त्याचवेळी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.


महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर 



  • मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

  • कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

  • चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33  रुपये प्रति लिटर


देशात मे 2022 नंतर किंमतींमध्ये कोणताही बदल नाही


शेवटच्या वेळी पेट्रोल-डिझेलचे दर मे 2022 मध्ये बदलले होते. त्यानंतर पेट्रोलवर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये उत्पादन शुल्क कमी करण्यात आलं. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 9.5 आणि 7 रुपयांनी कमी झाले आहेत. जुलै 2022 मध्ये, महाराष्ट्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये 5 आणि 3 रुपये प्रति लिटर कपात केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील दर आणखी घटले होते. 


Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या


इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).