Petrol Diesel Rates Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत (Crude Oil Price) घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. WTI क्रूड 0.27 टक्क्यांनी घसरुन 73.51 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं आहे. तसेच, ब्रेंट क्रूडमध्ये 0.26 टक्क्यांनी घट होऊन 77.24 डॉलर प्रति बॅरलनं विकलं जात आहे. अशातच देशातील तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol and Diesel Rate) सुधारित केले जातात. जून 2017 पूर्वी दर 15 दिवसांनी किमतीत सुधारणा केली जात होती.


देशात सर्वात महाग पेट्रोल राजस्थानमध्ये


भारतात सर्वात महाग पेट्रोल-डिझेलच राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये विकलं जात आहे. इथे एक लिटर पेट्रोलची किंमत 113.30 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 98.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे. तसेच, महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोल 109.26 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 95.66 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. 


IOCL नुसार, देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल पोर्ट ब्लेअरमध्ये विकलं जात आहे. जिथे पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर आहे. तर सर्वात महाग इंधन राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये विकलं जातंय. श्रीगंगानगरमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 113.30 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर 98.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचलाय.


देशाची राजधानी नवी दिल्लीसह महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. दुसरीकडे, अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या दरांत किरकोळ वाढ नोंदवण्यात आली आहे आणि अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या दरांत काही प्रमाणात घटही नोंदवण्यात आली आहे. दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तसेच, कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय  राज्य स्तरावर पेट्रोलवर लावण्यात आलेल्या करामुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही भिन्न असतात.


Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर? 



  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

  • पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 

  • कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर

  • छत्रपती संभाजीनगर : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर 

  • परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर

  • नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर


तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत SMSद्वारे चेक करा 


तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. तुमच्या शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.