Petrol and Diesel Prices 06th April 2023: गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत (Crude Oil Price)  वाढ झाली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे, तेल उत्पादक देशांचा समूह असलेल्या OPEC नं मे 2023 पासून तेल उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.


कच्च्या तेलाच्या आजच्या दरांबद्दल बोलायचं झालं तर आज कच्च्या तेलाच्या दरांमध्ये काहिशी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.  ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 84.91 डॉलरपर्यंत घसरली आहे. जागतिक बाजारपेठेत डब्ल्यूटीआयचा दरही प्रति बॅरल 80.50 डॉलरपर्यंत घसरला आहे.


देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबात (Petrol and Diesel Prices) बोलायचं झालं तर, आज सकाळी भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आजही देशातील महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र, काही राज्यांतील पेट्रोल-डिझेलच्या दरांत मात्र काहीशी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. 


देशातील महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर काय? 


भारताची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलची किंमत 106.31 रुपये आहे, तर डिझेलची किंमत 94.27 रुपये प्रति लिटर आहे. कोलकात्यात पेट्रोल आणि डिझेलची किंमत 106.03 रुपये प्रति लिटर आणि 92.76 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर 102.63 रुपये आणि 94.24 रुपये प्रति लिटर आहे.


देशात 'या' शहरात मिळतंय सर्वात स्वस्त पेट्रोल


iocl ने जारी केलेल्या दरांनुसार, देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये आहे, जिथे किंमत 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती राष्ट्रीय स्तरावर मे 2022 पासून आतापर्यंत जैसे थे आहेत. अशा स्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये चढ-उतार होऊनही दर वाढलेले नाहीत किंवा कमीही झालेले नाहीत. अशातच दर किती दिवस स्थिर राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीचा दिल्ली-मुंबईसह देशातील महानगरांतील तेलाच्या किमतींवर कोणताही परिणाम झालेला नाही.


Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर? 



  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

  • पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 

  • कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर

  • औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर 

  • परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर

  • नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर



पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे ठरवले जातात?



पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ठरवण्यासाठी अनेक घटक जबाबदार असतात. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत आणि रुपया आणि डॉलरचा दर यांचाही मोठा वाटा आहे. ओपेक प्लस म्हणजे पेट्रोलियम उत्पादक देशांनी केलेल्या उत्पादनात कपात आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती यामुळे सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. भारतातील तेल कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर कायम ठेवले आहेत.