Income Tips: वाढत्या महागाईच्या काळात  कमी खर्चात घर चालवणे म्हणजे तारेवरची कसरत ठरत आहे. कमी उत्पन्न (Low Income) असले तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आम्ही सांगत असलेल्या पाच टिप्समुळे (Tips For Wealth) तुमचे उत्पन्न वाढू शकते. मात्र, यासाठी तुम्हाला तुमच्या  समजेप्रमाणे गुंतवणूक (Investment) करावी लागणार आहे. तुमच्या मासिक खर्चावर कोणताही परिणाम होऊ नये हेही लक्षात ठेवणे आवश्यक आहे. रणनीती, कौशल्य, आवड आणि इतर गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही या सूचनांचा अवलंब करू शकता.


अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करणे


अल्पबचत योजनेच्या अनेक योजनांमधील गुंतवणुकीवरील व्याज वाढले आहे. अशा परिस्थितीत आता नागरिकांना चांगले व्याज दिले जात असून त्यात कमी पैसेही गुंतवले जाऊ शकतात. या योजनांमध्ये तुम्हाला सरासरी 8 टक्के व्याज मिळू शकते. दुसरं म्हणजे यात कर सवलत, कर वजावटीचा लाभ मिळतो आणि ही गुंतवणूक सुरक्षित आहे.


तुमची कौशल्ये वापरा


तुमच्याकडे काही खास कौशल्य असेल तर तुम्ही ते वापरून पैसे कमवू शकता. समजा तुम्ही ब्लॉगिंगमधून काहीतरी चांगले लिहीत असाल, तर तुम्ही ब्लॉग फ्रीलान्स करून किंवा वेबसाइटसाठी लिखाण करून पैसे कमवू शकता. हे काम तुम्ही तुमच्या उरलेल्या वेळेत करून तुमचे उत्पन्न वाढवू शकता.


घर किंवा खोली भाड्याने देणे


तुमच्याकडे वापरत नसलेले घर किंवा खोली असेल तर तुम्ही ते  भाड्याने देऊ शकता. शहरात एखादे घर असल्यास, घर किंवा खोली भाड्याने देता येते. त्याशिवाय, हे घर, खोली पर्यटकांनाही भाड्याने देता येते. 


SIP मध्ये गुंतवणूक करा


तुमच्याकडे पुरेसे पैसे असल्यास तुम्ही दरमहा 1000 किंवा 500 जमा करू शकता, तर तुम्ही SIP द्वारे दर महिन्याला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. दीर्घकाळ गुंतवणूक करून तुम्ही दीर्घकाळात चांगले पैसे कमवू शकता.


बँक एफडी गुंतवणूक योजना


तुमच्याकडे काही पैशांची बचत असल्यास, ते बचत खात्यात न ठेवता बँकेच्या मुदत ठेव योजनेत जमा करू शकता. बँक एफडीमध्ये 10 वर्षांसाठी पैसे जमा केले जाऊ शकतात, ज्यावर बँक तुम्हाला वार्षिक व्याज देईल. सध्या काही बँकांकडून सर्वसामान्य नागरिकांना 8 टक्के व्याज दिले जात आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: