Viral Old Man Holds 100 Crore Shares : अनेक जण श्रीमंत (Rich) होण्याची स्वप्न बघतात. यासाठी लोक विविध पर्याय निवडतात, गुंतवणुकीचे (Investment) विविध पर्यायही न्याहाळतात. यातच काही लोक शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक करण्याची स्वप्न पाहतात. श्रीमंत होऊन मोठ्या गाडीत फिरणं, राहणीमान सुधारणं अशीची काहींची इच्छा असते. पण, काही लोक भरपूर पैसा असूनही त्यांचं साधं राहणीमान सोडत नाहीत. सध्या अशीच एक व्यक्ती चर्चेत आहे. सोशल मीडियावर 'शेअरवाले बाबा' नावाने एक आजोबा व्हायरल होत आहेत. या आजोबांकडे 100 कोटी रुपये किमतीचे शेअर्स असल्याचा दावा करण्यात येत आहे.


'या' आजोबांकडे 100 कोटी रुपयांचे शेअर्स


सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओमध्ये एका अतिशय सामान्य व्यक्ती दिसत आहे. या अतिशय सर्वसामान्या दिसणाऱ्या वृद्धाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याचं कारण म्हणजे त्ंयाच्याकडे करोडोंचे शेअर्स असल्याचा दावा केला जात आहे. महत्वाचं म्हणजे या आजोबांचा साधोपणा पाहून तुम्हांला असं वाटणारही नाही की, त्यांच्याकडे कोट्यवधींचे शेअर्स आहेत.


या कंपन्यांच्या शेअर्स असल्याचा दावा


सोशल मीडिया एक्स (X) वर राजीव मेहता नावाच्या युजरने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती सांगत आहे की, त्याच्याकडे 100 कोटींपेक्षा जास्त किमतीचे स्टॉक्स आहेत. या आजोबांनी दावा केला आहे की, त्यांच्याकडे 80 कोटी रुपयांचे एल अँड टी (L&T) शेअर्स, 21 कोटी रुपयांचे अल्ट्राटेक सिमेंटचे आणि 1 कोटी रुपयांचे कर्नाटक बँकेचे शेअर्स आहेत. जर, या दाव्यावर विश्वास ठेवला तर, या अगदी साध्या हाफ चड्डीमध्ये दिसणाऱ्या आजोबांकडे 102 कोटी रुपयांचे शेअर्स असल्याचं म्हटलं जात आहे.


पाहा व्हायरल व्हिडीओ :






'या' हिशोबाने आजोबा आहेत करोडपती


मात्र, अनेक जण या दाव्याशी सहमत नाहीत. कॅपिटल माइंडचे संस्थापक आणि सीईओ दीपक शेनॉय यांनी या पोस्टवर कमेंट करत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. दीपक शेनॉय यांच्या म्हणण्यानुसार, या आजोबांकडे एल अँड टीचे 27 हजार शेअर्स आहेत, ज्याची किंमत सुमारे 8 कोटी रुपये आहे. तसेच त्यांच्याकडे असलेल्या अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर्सची किंमत सुमारे 3.2 कोटी रुपये तर, कर्नाटक बँकेच्या शेअर्सची किंमत सुमारे 10 लाख रुपये आहे. यानुसार या सर्व शेअर्सची एकूण किंमत 11 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 


फक्त डिव्हिडंडमधून लाखोंची कमाई


दरम्यान, व्हिडीओमध्ये केलेले दावा खरा असेल तर, या आजोबांकडे करोडोंची संपत्ती आहे. त्यामुळे सोशल मीडियावर यूजर्स त्यांना 'शेअरवाले बाबा' असं म्हणत आहेत. एका युजरने डिव्हिडंडमधून कमाईचे गणितही समजावून सांगितले. वापरकर्त्याने शेअर्सच्या संख्येनुसार गणना केली आणि सांगितले की तो एकट्या लाभांशातून लाखोंची कमाई करेल.


शेअर बाजारातून नफा मिळवण्याचा 'बेस्ट' मार्ग


व्हिडीओमध्ये करण्यात आलेले दावे खरे असल्याची पुष्टी एबीपी करत नाही. पण, शेअर बाजारात गुंतवणुकीतून नफा मिळवण्यासाठीची एक खरी बाब म्हणजे तुम्ही चांगले शेअर्स खरेदी केले आणि तुमची गुंतवणूक दीर्घकाळासाठी राखून ठेवा. यामुळे तुम्हाला जास्त नफा मिळवण्याची संधी मिळेल. तज्ज्ञ हेच सांगतात.