SBI Amrit Kalash FD Scheme : डिसेंबर (December) संपून नववर्ष (New Year 2024) सुरु होण्यास अगदी मोजके दिवस शिल्लक आहेत. नवीन वर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु आहे. डिसेंबर महिना संपताना अनेक महत्त्वाच्या कामांच्या डेडलाईन 31 डिसेंबरला संपत आहे. 31 डिसेंबरला गुंतवणूक योजनेची देखील शेवटची तारीख आहे. यातीलच एक योजना म्हणजे स्टेट बँकेची अमृत कलश एफडी योजना (SBI Amrit Kalash FD Scheme) आहे. एसबीआय अमृत कलश मुदत ठेव योजनेमध्ये गुंतवणुकीची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 (SBI Amrit Kalash FD Scheme Last Date) आहे.


स्टेट बँक अमृत कलश योजना


भारतीय स्टेट बँकेने (State Bank of India) या वर्षी 12 एप्रिल 2023 रोजी ही योजना सुरू केली होती. या योजनेची (Amrit Kalash FD Scheme) अंतिम मुदत आधी 23 जूनपासून 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती आणि त्यानंतर ही मुदत 31 डिसेंबरपर्यंत (SBI Amrit Kalash FD Scheme Last Date)वाढवण्यात आली होती. आता या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी फक्त पाच दिवस उरले आहेत.


कशी आहे स्टेट बँकेची अमृत कलश योजना?


देशातील कोणताही नागरिक किंवा NRI स्टेट बँकेच्या (SBI) अमृत कलश योजनेत गुंतवणूक करू शकतो. ही 400 दिवसांची विशेष FD योजना आहे, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के जास्त व्याज मिळत आहे. या योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना 7.1 टक्के व्याज मिळत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 7.6 टक्के व्याजदराचा लाभ मिळत आहे. तुम्ही या योजनेत 31 डिसेंबर 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेची खास गोष्ट म्हणजे तुम्ही यामध्ये ऑनलाइन बँकिंग किंवा मोबाइल बँकिंगद्वारे गुंतवणूक करू शकता. याशिवाय या एफडीवर तुम्हाला कर्जाची सुविधाही मिळते.