PPF vs SIP : शेअर बाजारात (Share Market) योग्य पद्धतीने गुंतवणूक (Investment Plan) केल्यास कोट्यवधी कमावण्याची संधी असते. शेअर बाजारातून जास्त नफा मिळवण्यासाठी कालावधीदेखील महत्त्वाचा असतो. जास्त काळ गुंतवणूक करणाऱ्यांना कोट्यवधींपर्यंत नफा मिळण्याची संधी असते. पण, पीपीएफ किंवा एसआयपीमध्ये गुंतवणूक करून तुम्ही कोट्वधींचा नफा कमवू शकता का, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर आज या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या.


पीपीएफमध्ये किती परतावा मिळेल?


जर तुम्ही दररोज 200 रुपये जमा करत असाल, तर महिन्याभरात तुमचे 6000 रुपये जमा होतात. जर तुम्ही रिटायरमेंटपर्यंत ही रक्कम जमा करत असाल, तर मोठी रक्कम जमा होते. या आकडेवारीनुसार, वर्षाला 72000 रुपये जमा होतात. बहुतेक लोक पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात, कारण यामध्ये सुरक्षेची हमी आणि निश्चित परतावा मिळतो. यासोबतच तुम्हाला आयकरातून 1,50,000 रुपयांपर्यंत सूट मिळते. पीपीएफमध्ये गुंतवणूकीचा किमान कालावधी 15 वर्षे आहे, त्यामुळे नियमितपणे गुंतवणूक केल्या 15 वर्षांमध्ये 19 लाख 52 हजार 740 रुपये रक्कम जमा होते.


हे माहित आहे?


तुम्ही PPF मध्ये दररोज 200 रुपये रक्कम 20 वर्षे जमा करत राहिल्यास ही रक्कम 31 लाख 95 हजार 978 लाख रुपये होईल. याचा कालावधी आणखी पाच वर्षे वाढवल्यास 49 लाख 47 हजार 847 रुपये मिळतील. PPF ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे, पण त्याचा व्याजदर दर तीन महिन्यांनी निश्चित केला जातो. सध्या PPF वर 7.1 टक्के व्याजदर आहे. तुम्ही सतत 25 वर्षे गुंतवणूक करूनही तुमचा फंड 2 कोटी रुपयांचा होऊ शकत नाही. पण SIP द्वारे हे शक्य आहे.


SIP द्वारे गुंतवणुकीचा किती नफा होईल?


तुम्ही एसआयपीमध्ये दरमहा 6000 रुपये गुंतवल्यास. तुमचे पैसे म्युच्युअल फंड SIP मध्ये दर महिन्याला 25 वर्षांसाठी जमा करत असाल आणि 10 टक्के परतावा मिळत असेल, तर मॅच्युरिटीवर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 80 लाख 27 हजार 342 रुपये होईल. आता तुम्ही ही गुंतवणूक 30 वर्षांसाठी वाढवली तर, तुम्हाला 1 कोटी 36 लाख 75 हजार 952 रुपयांचा परतावा मिळेल. सध्या बाजारात व्यवहार सुरु असल्याने. त्यानुसार, जर तुम्हाला 12-15 टक्के परतावा आणि नफा मिळाला तर तुम्ही दोन कोटी रुपयांचा निधी जमा कराल. 12 टक्क्यांनुसार ही रक्कम 25 वर्षात 1 कोटी 13 लाख 85 हजार 811 रुपये तर 30 वर्षात ही रक्कम वाढून 2 कोटी 11 लाख 79 हजार 483 रुपये होईल. त्यामुळे एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्यास पीपीएफपेक्षा जास्त नफा मिळवता येतो.





(Disclaimer : ही बातमी केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात व्यवहार करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. तुमच्या आर्थिक नुकसानीला एबीपी माझा जबाबदार राहणार नाही.) 


महत्त्वाच्या इतर बातम्या :





SIP Investment : एसआयपीमध्ये गुंतवणूक करताय? भरघोस परतावा मिळण्यासाठी या टिप्स फॉलो करा