Best Saving Scheme : तुम्ही पोस्ट ऑफिस टीडी (Post Office) आणि एसबीआय (SBI) एफडी (FD) योजनेत गुंतवणूक करण्याचा (Saving Schemes) विचार करत असाल, तर या दोन्ही योजनांवर मिळणाऱ्या व्याजदराबद्दल तुम्हाला माहित आहे का? पोस्ट ऑफिस योजना आणि एसबीआय एफडी (SBI FD) 3 वर्षे गुंतवणूक केल्यास या दोन्ही पैकी कुठे जास्त व्याजाचा फायदा मिळेल, याबाबत सविस्तर जाणून घ्या.


प्रत्येक जण आपल्या पगारातील काही रक्कम वाचवून त्याची गुंतवणूक करण्याचा विचार करतो. ज्यामुळे त्यांना पैसै गुंतवून भविष्य सुरक्षित करता येईल. बचती करण्यासाठी बँकांच्या मुदत ठेव योजना (FD Scheme) हा एक लोकप्रिय आणि उत्तम पर्याय बनला आहे.


पोस्ट ऑफिस की मुदत ठेव योजना?


बाजारात गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहे. मात्र, बहुतेक काही गुंतवणूकदार मुदत ठेव योजनांमध्ये पैसे गुंतवण्यास प्राधान्य देतात. जर तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुदत ठेव योजनेमध्ये पैसे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर या दोन्ही योजनांमध्ये दोन ते तीन वर्षांच्या कालावधीसाठी व्याजदर किती मिळेल याची सविस्तर माहिती तुम्हाला येथे मिळेल.


कुठे मिळेल जास्त फायदा?


स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या सामान्य ग्राहकांना 2 ते 3 वर्षांच्या मुदत ठेव योजनेवर 7 टक्के व्याज दर देत आहे. या कालावधीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के व्याजदर दिला जात आहे. SBI च्या विशेष FD योजना अमृत कलश योजनेअंतर्गत, सामान्य ग्राहकांना 400 दिवसांच्या FD वर 7.10 टक्के व्याजदराचा लाभ मिळत आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याजदर मिळत आहे.


पोस्ट ऑफिस टीडी योजनेचा फायदा काय?


पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट योजनेअंतर्गत, ग्राहकांना एक वर्षाच्या कालावधीसाठी 6.90 टक्के व्याजदराचा लाभ मिळत आहे. त्याच प्रमाणे, दोन वर्षांच्या एफडीसाठी 7.00 टक्के आणि 3 वर्षांच्या एफडीसाठी 7.00 टक्के व्याजदराचा लाभही उपलब्ध आहे.


अशा परिस्थितीत, एसबीआय आणि पोस्ट ऑफिस एफडीवर 2 वर्षांच्या कालावधीसाठी समान व्याजदर उपलब्ध आहे. SBI अमृत कलश योजनेअंतर्गत तुम्हाला 7.10 टक्के जास्त व्याजदराचा लाभ मिळेल. यासोबतच ज्येष्ठ नागरिकांना SBI मध्ये अतिरिक्त 0.50 टक्के व्याजाचा लाभ मिळत आहे.




(Disclaimer : ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. ही माहिती गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा.)




महत्त्वाच्या इतर बातम्या :


FD Rates : SFB कडून फक्त 3 वर्षांच्या FD वर 8.60 टक्के व्याज, भरघोस फायदा मिळवण्याची संधी