Post Office New Rule : जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच. 1 एप्रिल 2022 पासून बदलणाऱ्या नियमांमुळे पोस्टात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या खिशावर परिणाम होणार आहे. पोस्ट ऑफिसच्या बदललेल्या नियमांनुसार, आता गुंतवणूकदारांना टर्म डिपॉजिट (मुदत ठेवी), सीनियर सिटीजन सेविंग्स स्कीम आणि मासिक उत्पन्न योजना (MIS) मध्ये गुंतवणूक करण्यासाठी बचत खातं किंवा बँक खातं उघडणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
पोस्ट ऑफिसनं आता 1 एप्रिल 2022 पासून ज्येष्ठ नागरिक बचत योजना, मासिक उत्पन्न योजना, टर्म डिपॉझिट (मुदत ठेव) खातं इत्यादींसारख्या लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी बँक खातं उघडणं बंधनकारक असणार आहे. आता या छोट्या बचत खात्यांमध्ये जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला मिळणारे व्याज पोस्ट ऑफिसमधील बचत खात्यात किंवा बँक खात्यातच जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिसकडून ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं बचत खातं नाही, अशा सर्व गुंतवणूकदारांना खातं उघडण्यास बंधनकारक करण्यात आलं आहे.
पोस्ट ऑफिस किंवा बँकेत सेव्हिंग अकाउंट आवश्यक
गुंतवणूकदारांना लवकरात लवकर आपलं पोस्ट ऑफिसमधील खातं किंवा बँक बचत खातं उघडावं लागणार आहे. त्यानंतरच पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजना, एमआयएस, टर्म डिपॉझिट इत्यादींवरील व्याज आता त्या खात्यात जमा केलं जाईल, असं पोस्ट ऑफिसनं म्हटलं आहे. तुमचं आधीच बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील बचत खातं असल्यास ते पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत खात्याशी लिंक करा. सरकारनं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, बचत खातं नसेल तर पोस्टातील लहान बचत खात्यांचं व्याज मिळणार नाही. त्यामुळे 31 मार्च 2022 पूर्वी हे महत्त्वाचे काम पूर्ण करा.
पोस्ट ऑफिसनं या बदललेल्या नियमानुसार, गुंतवणूकदारांनी लवकरात लवकर आपलं पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं किंवा बँकेत सेव्हिंग अकाउंट उघडावं लागेल. पोस्टाच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजना, MIS, टाईम डिपॉझिट खातं यांसारख्या खात्यांवरील व्याज आता त्या अकाउंट्समध्ये जमा होईल. जर तुमचं बँक खातं किंवा पोस्ट खातं असेल, तर ते तुम्ही तुमच्या पोस्टातील इतर खात्यांशी लिंक करु शकता. सरकारनं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, जर बचत खातं पोस्टाच्या खात्यांना लिंक केलं नाही, तर गुंतवणूकदारांना व्याज मिळणार नाही. त्यामुळे जर तुमची खाती पोस्टात असतील तर 31 मार्च 2022 पूर्वी तुमच्या बँक अकाउंटशी लिंक करा.
SCSS/TD/MIS अकाउंट्स लिंक कसे कराल?
जर तुम्हाला पोस्ट ऑफिस बचत खातं SCSS/TD/MIS शी लिंक करायचं असेल, तर तुम्ही यासाठी ऑटोमॅटिक ट्रान्सफर (Automatic Transfer ) सेवेचा लाभ घेऊ शकता. याशिवाय, बँक खातं लिंक करण्यासाठी, तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन बँक पासबुक किंवा कॅन्सल चेकद्वारे लिंक करू शकता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
फक्त 250 रुपये गुंतवा अन् मुलीच्या भविष्याची तरतूद करा, 'ही' सरकारी योजना फायदेशीर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha