मुंबई पोस्ट ऑफिस योजना (Post Office Scheme)  देशाच्या कानाकोपऱ्यात, गाव, शहर, जिल्हा इत्यादी ठिकाणी राहणाऱ्या लोकांसाठी सहज उपलब्ध आहेत. या योजना सरकार चालवतात ज्यात त्यांचे पैसे सुरक्षित राहतात आणि त्यांना आकर्षक परतावा मिळतो. निवृत्तीनंतर स्थिर उत्पन्नाबाबत तुम्हाला चिंता सतावत असेल तर पोस्ट ऑफिसच्या बचत योजना तुम्हाला मदतशीर ठरू शकते. पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक (Investment) करणे म्हणजे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे. आकर्षक व्याज दर, चांगला परतावा पोस्टाच्या विविध योजनांमध्ये तुम्हाला मिळतो. 


पोस्ट ऑफिसच्या गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही मासिक उत्पन्न मिळवू शकता. हे गुंतवणूक खाते तुमच्या जोडीदारासोबत म्हणजेच पती-पत्नी एकत्र उघडता येते. म्हणजेच दोघेही संयुक्त खाते उघडू शकतात. पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे नाव 'पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना'  (Post Office Monthly Scheme)  म्हणून ओळखले जाते.


या योजनेत तुम्ही एकरकमी गुंतवणूक करून मासिक पैसे मिळवू शकता. तुमच्या जमा केलेल्या पैशावर तुम्हाला व्याज मिळेल आणि हे व्याज तुम्हाला दर महिन्याला मिळेल. या योजनेअंतर्गत तुम्ही मासिक 9,250 रुपये पेन्शन घेऊ शकता. तुम्ही सिंगल इन्व्हेस्टमेंट निवडल्यास, तुम्ही जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवू शकता. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत संयुक्त खाते उघडायचे असेल तर तुम्ही 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. सध्या ही सरकारी योजना 7.4 टक्के दराने व्याज देत आहे.


तुम्ही तुमच्या पत्नीसोबत संयुक्तपणे गुंतवणूक खाते उघडल्यास, तुम्हाला 15  लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 1,11,000 रुपये वार्षिक व्याज मिळेल. दर महिन्याला तुम्हाला 9,250 रुपये पेन्शन मिळेल. हे फक्त तुमचे व्याजाचे पैसे आहे. पोस्ट ऑफिस योजनेत तुमची गुंतवणूक सुरक्षित राहते. मॅच्युरिटीनंतर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही योजनेतील पैसे 5 वर्षांसाठी वाढवू शकता. हे खाते 3 लोक एकत्र उघडू शकतात


पोस्ट ऑफिस मासिक योजना 5 वर्षात मॅच्युअर होते. ही गुंतवणूक वेळेपूर्वी बंद करता येऊ शकते. एका वर्षाच्या ठेवीनंतर पैसे काढता येतात. जर तुम्ही एक ते तीन वर्षांच्या दरम्यान पैसे काढले तर 2 टक्के कपात केली जाते. तीन वर्षांनी पैसे काढल्यावर एक टक्का कपात केली जाते. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :