Investment Tips for FD Scheme: अनेकजण आपल्या बचतीमधील रक्कमेचा काही भाग गुंतवणुकीसाठी (Investment) वापरतात. भारतात आजही बहुतांशीजण सुरक्षित आणि निश्चित परतावा म्हणून मुदत ठेवीत (Fixed Deposit) गुंतवणूक करतात. फक्त सुरक्षित गुंतवणूक म्हणून मुदत ठेव एवढाच फायदा नसून त्याचे इतरही फायदे आहेत. 


ज्येष्ठ नागरीक आपल्या निवृत्तीनंतर मिळणारा पैसा हा मुदत ठेवीत गुंतवतात. मुदत ठेवीत गुंतवणूक करणे ही सुरक्षित गुंतवणूक समजली जाते. बाजारातील गुंतवणुकीत असणारी जोखीम मुदत ठेवीत नसते. मागील काही महिन्यात मुदत ठेवीवरील व्याज दरात वाढ झाली आहे. त्यामुळे मुदत ठेवीत तुम्ही गुंतवणूक करू इच्छित असाल तर, त्याचे काही फायदेदेखील जाणून घेणे आवश्यक आहे. 


बँकेतील मुदत ठेवीवर गुंतवणूकदारांना कर्जाची सुविधा उपलब्ध होते. अनेकदा बँक कर्ज देताना हमी मागते. अशावेळी मुदत ठेव ही हमीच्या स्वरुपात वापरून कर्ज (Loan Against FD) मिळवू शकता. 


बँकांमधील कर बचतीच्या मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करून तुम्ही आयकर कायद्यातील 80 सी कलमनुसार 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर सवलत मिळवू शकता. 


काही बँकांकडून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मुदत ठेवीच्या योजनेवर विमादेखील देतात. इन्शुरन्स कव्हर मिळवण्यासाठी तुम्हाला काही अटींची पूर्तता करावी लागते. 


बँकेत पाच लाख रुपयांच्या मुदत ठेवीच्या योजनेवर डिपॉझिट इन्शूरन्स अॅण्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून पाच लाखापर्यंतचा विमा मिळतो. बँक बुडीत गेल्यास एखाद्या ग्राहकांची पाच लाख रुपयापर्यंतची मुदत ठेव बुडाल्यास रिझर्व्ह बँकेकडून त्यांना विमा दाव्याची रक्कम दिली जाते. 


बँकेच्या मुदत ठेवीवरील व्याज दर रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरावर अवलंबून असते. मुदत ठेवीतील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीवर अवलंबून नसते. मुदत ठेवीची मुदत पूर्ण झाल्यानंतर ग्राहकाला निश्चित झालेली रक्कम मिळते. म्युच्युअल फंडसारख्या काही गुंतवणूक योजना या शेअर बाजारातील घडामोडींशी निगडीत असतात. त्यामुळे अशा गुंतवणुकींमध्ये बाजारातील तेजी आणि घसरणीचा परिणाम हा गुंतवणुकीवर होतो. जोखीम नसल्यामुळे मुदत ठेवीत अनेकजण गुंतवणूक करतात. 


मुदत ठेव योजनेतील तुमच्या गुंतवणुकीची मुदत पूर्ण झाल्यास आणि पैशांची आवश्यकता नसल्यास तीच रक्कम व्याजासह पुन्हा गुंतवू शकता. 30 दिवस व त्याहून अधिक कालावधीच्या मुदत ठेवीसाठी तुम्ही अशा पद्धतीने गुंतवणूक करू शकता. काही वर्षांनी तुमच्याकडे एक चांगली रक्कम जमा झालेली असू शकते. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: