Income Tax Rules : नवीन आर्थिक वर्षाला (Financial Year) सुरुवात झाली आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरु होताच काही नवीन आर्थिक नियमही लागू करण्यात आले आहेत. 1 एप्रिलपासून नवीन कर प्रणाली लागू (New Tax Regime) करण्यात आली असून यामध्ये कर सूट देखील उपलब्ध आहे. त्यामुळे भारतीय करदात्यांना कर भरण्यासाठी नवीन कर व्यवस्था आणि जुनी कर व्यवस्था असे दोन पर्याय आहेत. नवीन आर्थिक वर्ष 2024-25 साठी तुम्ही स्वतः कोणतीही कर प्रणाली निवडली नाही, तर तुमचा ITR नवीन कर प्रणाली अंतर्गत दाखल केला जाईल. आणि तुम्हाला नवीन कर प्रणालीनुसार कर भरावा लागेल.


नव्या आर्थिक वर्षात नवीन कर प्रणाली लागू


1 एप्रिलपासून नवीन कर प्रणाली लागू झाली असून आता करदात्यांना कर भरण्यासाठी दोन कर व्यवस्था उपलब्ध आहेत. तुम्हाला आता आयटीआर दाखल करताना कर प्रणाली निवडावी लागेल. जुनी कर प्रणाली आणि नवीन कर प्रणाली यातील एक निवड करदात्याचा आयटीआर दाखल करताना करावी लागेल. जर ITR भरताना तुम्ही कोणतीही कर व्यवस्था निवडली नाही तर, चालू आर्थिक वर्ष 2024-25 साठी तुमचा आयटीआर (Income Tax Return) नवीन कर प्रणाली अंतर्गत दाखल केला जाईल. 


नवीन कर प्रणालीमध्ये किती उत्पन्न करमुक्त आहे?


नवीन कर प्रणालीमध्ये फक्त तीन लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे. पण, तुम्ही वार्षिक 7 लाख रुपयांपर्यंत कमावले तरीही तुम्हाला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही. कारण, आयकर कायद्याच्या कलम 87A अंतर्गत, 12,500 रुपयांची थेट कर सूट उपलब्ध आहे. 


सोप्या भाषेत, जर तुम्हाला तुमच्या उत्पन्नावर 12,500 रुपये किंवा त्यापेक्षा कर द्यावा लागणार असेल, तर तुम्हाला आयकर विभागाला एक पैसाही भरावा लागणार नाही. कारण कलम 87A अंतर्गत नवीन कर प्रणालीमध्ये, वार्षिक 7 लाख रुपयांपर्यंत कमाई करणाऱ्यांचा कर शून्य होईल. यामुळे तुम्हाला सात लाख रुपये उत्पन्नावरील 12,500 रुपयांपर्यंतच्या करात सूट असेल.


नवीन कर प्रणालीचे कर स्लॅब



  • नवीन कर प्रणालीमध्ये 0 ते 3 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. 

  • 3 ते 6 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5 टक्के

  • 6 ते 9 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10 टक्के कर

  • 9 ते 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 15 टक्के कर

  • 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 20 टक्के कर 

  • 15 लाखांपर्यंत आणि 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के  कर

  • 4 टक्के आरोग्य आणि शिक्षण उपकर म्हणूनही आकारला जातो.


 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


New Financial Rules : आजपासून या नियमांमध्ये बदल; नव्या आर्थिक वर्षात खिशाला झळ