मुंबई : भारतीय आयुर्विमा महामंडळ ही देशातील सर्वात मोठी आणि जुनी विमा कंपनी आहे. देशभरात एलआयसीचे कोट्यवधी पॉलिसीधारक आहेत. अनेक वेळा लोक पॉलिसी खरेदी करतात, परंतु काही कारणास्तव त्याचा हप्ता भरण्यास सक्षम नसतात. प्रीमियम न भरल्यामुळे पॉलिसी लॅप्स होते (LIC Lapsed Policy). अशा पॉलिसींच्या पुनरुज्जीवनासाठी, एलआयसी वेळोवेळी विविध विशेष मोहिमा (LIC Special Campaign for Policy Revival) चालवत असते.
LIC ने 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2023 दरम्यान लॅप्स पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी विशेष मोहीम चालवली आहे. वेळेवर प्रीमियम न भरल्यामुळे तुमची कोणतीही जुनी पॉलिसी लॅप झाली असेल, तर तुम्ही या मोहिमेत काही रक्कम जमा करून लॅप्स पॉलिसी पुन्हा अॅक्टीव्ह करू शकता.
लॅप्स पॉलिसी पुन्हा चालू करा
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) नियमांनुसार, जर एखाद्या पॉलिसीधारकाची पॉलिसी प्रीमियम न भरल्यामुळे रद्द झाली असेल, तर त्याची पॉलिसी पुन्हा चालू करण्यासाठी, तुम्हाला थकबाकी प्रीमियमसह काही दंड भरावा लागेल. थकित प्रीमियम भरल्यानंतर पॉलिसी पुनर्संचयित केली जाईल. यानंतरच तुम्ही त्याच्याशी संबंधित उर्वरित फायदे घेऊ शकाल.
लॅप्स पॉलिसी पुन्हा अॅक्टिव्ह कशी करावी
तुमची कोणतीही एलआयसी पॉलिसी बंद झाली असेल आणि तुम्हाला ती पुन्हा सुरू करायची असेल, तर त्यासाठी एलआयसीशी संपर्क साधा. यासाठी तुम्ही ईमेलद्वारे एलआयसी कस्टमर केअरशी संपर्क साधू शकता. एलआयसी पॉलिसी पुन्हा सर्वप्रथम एलआयसीच्या शाखेला भेट द्या, त्यानंतर रिवाइल फॉर्म भरून सबमिट करा. त्याशिवाय, प्रीमियम आणि दंड भरून तुमची पॉलिसी पुन्हा चालू करा.
LIC : मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाची काळजी? LIC 'या' योजनेमुळे लागेल हातभार
एलआयसीकडून देशातील प्रत्येक आर्थिक घटकांचा विचार करून विविध पॉलिसीज तयार केल्या जातात. यातील काही योजना मुलांसाठी (LIC Policy for Children) तयार करण्यात आल्या आहेत. अशाच एका नवीन पॉलिसीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुमच्या मुलांच्या भविष्याची चिंता दूर होण्यास मदत होईल. या योजनेचे नाव जीवन तरूण पॉलिसी (LIC Jeevan Tarun Policy) आहे.
या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मुलाचं वय कमीत कमी 3 महिने आणि जास्त जास्त 12 वर्ष असावं लागतं. यामध्ये मुलाचं वय 20 वर्ष होईपर्यंत गुंतवणूक करण्याची मुभा आहे. यानंतर 5 वर्षापर्यंत कोणत्याही प्रकारची गुंतवणूक केली जात नाही. मात्र, मुलांचं वय 25 वर्ष पूर्ण केल्यानंतर या गुंतवणुकीच्या रक्कमेवर दावा करता येतो. यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च भागू शकतो. तसेच लग्नाची चिंताही दूर होईल आणि मुलांचं भविष्य सुरक्षित राहिल. त्यामुळे या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर चांगला पर्याय आहे.