LIC Premium Payment Through UPI: देशभरात भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (Life Insurance Corporation) कोट्यवधी पॉलिसीधारक आहेत. एलआयसी (LIC) आपल्या ग्राहकांसाठी विविध योजना लागी करते. त्याशिवाय, ग्राहकांच्या सोयीसाठी डिजिटलायझेशनवरही विशेष लक्ष देते. जर, तुम्ही एलआयसी पॉलिसीचा प्रीमियम (LIC Policy Premium) प्रत्यक्ष एलआयसी ऑफिस अथवा बँकेत जाऊन भरत असाल तर आता तुमचा हा त्रास वाचणार आहे. घरी बसून अथवा एलआयसी ऑफिस, बँकेत न जाता एलआयसी पॉलिसी प्रीमियम भरता (Paying LIC Premium) येणार आहे.
तुम्ही एलआयसी पॉलिसी (LIC Policy Premium Payment by UPI App) प्रीमियम भरू शकता. याआधी नेट बँकिंग अथवा क्रेडिट/डेबिट कार्डच्या माध्यमातून प्रीमियम भरू शकत होता. आता मात्र, तुम्ही युपीआयच्या माध्यमातून पेमेंट करू शकता. पेटीएम (PayTm) आणि फोन पे अॅपच्या (Phone Pay) माध्यमातून तुम्ही प्रीमियम भरू शकता.
> पेटीएमच्या (PayTm) माध्यमातून असे भरा प्रीमियम:
1. पहिल्यांदा तुमचे पेटीएम अॅप सुरू करा.
2. येथे तुम्हाला LIC India चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
3. यानंतर तुम्हाला LIC पॉलिसी क्रमांक भरण्यास सांगितले जाईल. त्यानंतर तुम्ही उर्वरित तपशील भरा.
4. यानंतर तुम्हाला Proceed For Payment पर्यायावर क्लिक करावे लागेल.
5. यानंतर तुम्ही पेमेंटचा पर्याय निवडा.
6. पेमेंट केल्यानंतर, तुमचा LIC प्रीमियम जमा केला जाईल.
7. अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या LIC प्रीमियम भरू शकता.
>> फोन पेच्या (Phone Pay) माध्यमातून असे भरा प्रीमियम
1. LIC प्रीमियम भरण्यासाठी, सर्वप्रथम, तुम्ही PhonePe अॅप उघडा.
2. यानंतर तुम्हाला इन्शुरन्स प्रीमियम पेमेंटचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
3. त्यानंतर LIC प्रीमियम पेमेंट पर्याय निवडा.
4. पुढे तुमचा LIC नंबर आणि ईमेल आयडी एंटर करा आणि कन्फर्म वर क्लिक करा.
5. यानंतर तुम्हाला पेमेंटचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
6. तुमचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड तपशील भरा.
7. OTP नमूद करून सबमिट करा.
8. यानंतर तुमचा एलआयसी प्रीमियम जमा केला जाईल.
इतर महत्त्वाच्या बातम्या: