Government Scheme : सरकारी योजना गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहेत. यामध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळतो. त्याच वेळी, तुमचे पैसे देखील पूर्णपणे सुरक्षित आहेत. यापैकी बहुतेक योजनांमध्ये, एखादी व्यक्ती अगदी कमी रकमेसह गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकते आणि मोठा निधी तयार करू शकते. आज आम्ही तुम्हाला केंद्र सरकारच्या एका योजनेबाबत माहिती देणार आहोत. ज्यामार्फत तुम्ही 1 कोटी रुपयांचा फंड जमा करु शकता. या स्कीमचं नाव आहे, पब्लिक प्रोविडेंट फंड (Public Provident Fund). तुम्ही ही स्किम पोस्ट ऑफिस (Post Office) किंवा सरकारी बँकेकडून सुरु करु शकता. 


फक्त 500 रुपयांची गुंतवणूक करा 


तुम्ही पीपीएफमध्ये केवळ 500 रुपयांची गुंतवणूक करण्याची सुरुवात करु शकता. या अकाउंटमध्ये एक वर्षात अधिकाधिक 1.5 रुपये आणि दरमाह अधिकाधिक 12,500 रुपयांची गुंतवणूक करु शकता. यामध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. याव्यतिरिक्त व्याजदरही उत्तम मिळतो. PPF चा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षे आहे, परंतु तुम्ही तो 5-5 वर्षांच्या कालावधीत वाढवू शकता.
 
किती व्याज मिळणार? 


केंद्र सरकारच्या या योजनेवर सध्या गुंतवणूकदारांना 7.1 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळतो. या योजनेत सरकार दर महिन्याला मार्चनंतर व्याज देते. याशिवाय, तुम्ही तुमच्या स्वतःच्या नावाने किंवा अल्पवयीन व्यक्तीचे पालक म्हणून पीपीएफ खाते उघडू शकता.


करात मिळू शकते सूट 


या योजनेत गुंतवणूकदारांना आयकर सवलतीचा लाभही मिळतो. तुम्ही कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ घेऊ शकता.


कसे मिळवाल 1 कोटी रुपये? 


या योजनेतून एक कोटी रुपये जमा करायचे असतील, तर हा गुंतवणुकीचा कालावधी 25 वर्षांचा करावा लागेल. तोपर्यंत, 1.5 लाख रुपयांच्या वार्षिक ठेवीनुसार, 37,50,000 रुपये जमा झाले असतील. यावर वार्षिक 7.1 टक्क्यांच्या दरानं 65,58,012 रुपयांचं व्याज मिळतं. त्याच वेळी, तोपर्यंत मॅच्युरिटी रक्कम 1,03,08,012 रुपये झाली असेल. कृपया लक्षात घ्या की PPF खात्याचा परिपक्वता कालावधी 15 वर्षांचा आहे. जर हे खाते 15 वर्षांसाठी वाढवायचे असेल तर हे खाते पुढील पाच वर्षांसाठी वाढवता येईल.


(येथे ABP Majha कोणत्याही योजनेत गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहितीच्या उद्देशानं देण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणत्याही योजनेत पैसे जमा करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या)


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha