EPFO Insurance : EPFO आपल्या नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना जीवन विम्याचे संरक्षण देते. मात्र, अनेक ग्राहकांना याची माहिती नसते, त्यामुळे ते याचा लाभ घेऊ शकत नाहीत. EPFO कडून कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी आणि पेन्शनसह विमा संरक्षण देण्यात येते. 1976 पासून ईपीएफओमधील कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण दिले जात आहे. परंतु माहितीच्या अभावामुळे अनेकांना हे माहित नाही.
EPFO द्वारे नोंदणीकृत कर्मचाऱ्यांसाठी एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (EDLI) ही योजना लागू करण्यात आली आहे. ही योजना ईपीएफ आणि ईपीएसच्या संयुक्तपणे काम करते. या योजनेत नोकरीदरम्यान एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास EPFO कडून त्याच्या नॉमिनीला आर्थिक मदत म्हणून सात लाख रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाते. या विमा योजनेत कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली जाते.
EDLI योजनेत मिळालेला विमा दावा हा कर्मचाऱ्याच्या गेल्या 12 महिन्यांच्या पगारावर अवलंबून असतो. जर कर्मचारी सलग 12 महिने काम करत असेल तर त्याच्या मृत्यूनंतरच त्याच्या नॉमिनीला किमान 2.5 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळते. या योजनेत कर्मचारी जोपर्यंत नोकरीत आहे तोपर्यंतच त्याला संरक्षण मिळेल. नोकरी सोडल्यानंतर जर त्याचा मृत्यू झाला, तर त्याचे नॉमिनी किंवा कुटुंब विम्यासाठी दावा करू शकत नाही.
पगारातून पैसे कापले जातात
या योजनेंतर्गत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला किमान सात लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण मिळते. योजनेत सामील होण्यासाठी कर्मचाऱ्याला कोणताही वेगळा अर्ज किंवा फॉर्म भरण्याची गरज नाही. या योजनेत कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापलेल्या पीएफच्या 0.5 टक्के रक्कम जमा केली जाते. ही योजना EPF आणि EPS संयुक्तरित्या काम करते. तुमच्या पगारातून दरमहा कापल्या जाणाऱ्या पीएफच्या रकमेपैकी 8.33 टक्के रक्कम ईपीएसमध्ये, 3.67 टक्के ईपीएफ आणि 0.5 टक्के ईडीएलआय योजनेत जमा केली जाते.
महत्वाच्या बातम्या