पीएफमधून पैसे काढायचे आहेत, घरबसल्या अॅपने काढता येईल रक्कम
Umang App ने तुमच्या प्रॉव्हिडंट फंडमधील रक्कम काढता येईल. आणीबाणीच्या स्थितीत तुम्हाला याचा फायदा मिळू शकतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपीएफमध्ये आपली बचत होत असते. आणीबाणीच्या स्थितीत मोठा खर्च भागवण्यासाठी पीएफमधील रक्कमेचा फायदा होतो.
काही सोप्प्या पद्धतीने Umang App च्या माध्यमातून प्रॉव्हिडंट फंडमधील जमा रक्कम तुम्ही सहजपणे काढू शकता.
Umang App च्या मदतीने तुम्ही पीएफ खात्यातील रक्कम पाहू शकता.
पीएफ खात्यातील रक्कम काढण्यासाठी तुम्ही उमंग अॅप सुरू करा.
त्यानंतर EPFO च्या सेवा (Service) पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर Employee centric पर्यायावर क्लिक करा. पुढं Raise Claim च्या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर EPF UAN क्रमांक त्यात नमूद करा. त्याशिवाय तुम्हाला Registered मोबाइल क्रमांक आणि ओटीपी क्रमांक नमूद करावा लागेल.
पैसे काढण्यासाठी Withdrawal पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर तुमचा Claim status तपासून घ्या. तुम्ही सहजपणे पीएफ खात्यातून पैसे काढू शकता.