crore crypto scam in Delhi :
  
तुम्हाला गुंतवणूक करा सांगणारा एक मेल आला आहे का? तुम्हाला तो विश्वास ठेवण्याजोगा वाटतो आहे का? मेल क्रिप्टोकरन्सीशी संबंधित आहे का? हे एवढे सगळे विचारण्याचं कारण म्हणजे देशाच्या राजधानीत घडलेला प्रकार वाचा. म्हणजे गुंतवणूक करताना किती सावधगिरी बाळगायला हवी हे कळेल. नवी दिल्लीमध्ये क्रिप्टोकरन्सीमध्ये परताव्याची 200 टक्के हमी देऊन तब्बल 500 कोटींची फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे. एका अहवालातून ही माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त प्रकाशित केलं आहे.


घोटाळेबाजांनी त्यांच्या आगामी क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने पैसे गोळा केले होते, ज्याचे मूल्य 2.5 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 500 कोटींच्या घरात असल्याचा दावा पीडितांपैकी एकाने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना केला. या सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे संबंधित आरोपींना देश सोडून पळ काढला असावा अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

फसवणूक झाली कशी?

आरोपींनी गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका जबरदस्त कार्यक्रमाचं आयोजिन केले होतं, तिथे त्यांनी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली आणि त्यांच्या आगामी क्रिप्टोकरन्सीचे मूल्य भविष्यात गगनाला भिडणार असल्याचा दावाही केला. ही गोष्ट इतकीच मर्यादित नाही.


या आरोपींनी गुंतवणुकीवर 200 टक्के वार्षिक परतावा देण्याचे आश्वासन देण्याव्यतिरिक्त 5-20 टक्के मासिक परतावा देण्याचे आश्वासन देखील दिले होते, जे महिन्याच्या 5, 15 किंवा 25 व्या दिवशी गुंतवणूकदारांच्या बँक खात्यात जमा केले जाईल अशी माहिती पीडितांनी दिली आहे..

बरं हा कार्यक्रम आयोजित करुन आरोपींनी आपण दुबईमध्ये कार्यालय बांधलं आहे असा विश्वास संबंधित गुंतवणूकदारांना केला. त्यांच्यावर विशअवास ठेवून काही गुंतवणूकदारा सत्यता तपासण्यासाठी दुबईला गेले, तेव्हा त्यांना कथितपणे बांधकामाधीन इमारती आल्या अशी बाब  एफआयआरमध्ये नमूद करण्यात आली आहे. याशिवाय आरोपींनी महाराष्ट्रात सहकारी सोसायटी बँक चालवल्याचा दावाही केला होता, जो खोटा ठरला, असेही त्या एफआयआरमध्ये म्हणण्यात आलं आहे.

यामध्ये गुंतवणूकदारांना गुंतवणुकीबद्दलचे अपडेट देण्यासाठी आणि ते बिटकॉइनमध्ये रूपांतरित करण्याचा किंवा ऑनलाइन काढण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी दोन वेबसाइट शेअर केल्या होत्या. पण जेव्हा जेव्हा गुंतवणूकदारांनी त्यांच्या गुंतवणुकीची रक्कम काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा "एरर मेसेज" प्राप्त झाला, असा पीडितेचा आरोप आहे. 
 

ही बातमी देखील वाचा