Bharti Airtel Hexacom IPO : नवीन आर्थिक वर्षात (Financial Year 2024-25) तुम्ही गुंतवणूक करण्याचा प्लॅन करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. नवीन आर्थिक वर्षाचा पहिला आयपीओ खुला झाला असून त्यात गुंतवणूक करण्याची उत्तम संधी चालून आली आहे. 2024-25 आर्थिक वर्षातील पहिला आयपीओ बुधवारी खुला झाला आहे.  भारती एअरटेलच्या हेक्साकॉम कंपनीचा आयपीओ 3 एप्रिलपासून खुला झाला आहे. भारती एअरटेल कंपनीची सहाय्यक कंपनी हेक्साकॉमने आयपीओ बाजारात आणला असून याची किंमत 542 ते 570 दरम्यान आहे.


एअरटेल कंपनीचा आयपीओ खुला


भारती एअरटेल कंपनीची सहाय्यक कंपनी भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom IPO) कंपनीच्या आयपीओचा आकार 4275 कोटीचा आहे. कंपनी आयपीओतून 7.5 कोटींचे शेअर्स विकणार आहे. भारती हेक्साकॉम कंपनीचा आयपीओ खुला झाला असून यामध्ये तुम्ही 5 एप्रिलपर्यंत गुंतवणूक करू शकता. एअरटेल कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे नव्या आर्थिक वर्षातील पहिल्या आयपीओमध्ये गुंतवणूक करुन नफा कमावण्याची संधी सोडू नका.


गुंतवणूक करण्यासाठी फक्त दोन दिवस शिल्लक


भारती हेक्साकॉम कंपनी भारतीय शेअर बाजारात लिस्टिंगसाठी तयार आहे. भारती हेक्साकॉम आयपीओ 3 एप्रिलपासून खुला करण्यात आला असून यामध्ये तुम्ही 5 एप्रिलपर्यंत गुंतवणूक करु शकता. भारती हेक्साकॉम कंपनीच्या शेअर्सचं वाटप 8 एप्रिल रोजी करण्यात येईल. 12 एप्रिल रोजी भारती हेक्साकॉम कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात एनएसई आणि बीएसईवर लिस्टिंग होईल.


एअरटेल कंपनीची 70 टक्के भागीदारी


भारती हेक्साकॉम ही भारती एअरटेल कंपनीची सब्सिडिअरी म्हणजेच सहाय्यक कंपनी आहे. भारती हेक्साकॉम कंपनीमध्ये भारती एअरटेल कंपनीची 70 टक्के भागीदारी आहे. 


किती गुंतवणूक करावी लागेल?


नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्हाला भारती एअरटेलची सब्सिडिअरी कंपनी भारती हेक्साकॉममध्ये भागीदार होण्याची उत्तम संधी आहे. जर तुम्ही भारती हेक्साकॉम कंपनीचा आयपीओ विकत घेण्याच्या विचारात असाल तर, तुम्हाला किती गुंतवणूक करावी लागेल, याबाबत जाणून घ्या. 



  • भारती हेक्साकॉम कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करुन भागीदार होण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 26 शेअर्सचा लॉट खरेदी करावा लागेल. 

  • याचा अर्थ रिटेल गुंतवणूकदारांना प्रतिशेअर 542 ते 570 किमतीच्या बँडनुसार, कमीत कमी 14,820 रुपये गुंतवणूक करावी लागेल. 

  • हाय नेटवर्थ गुंतवणूकदारांना (HNI) कमीत कमी  14 स्लॉट खरेदी करावे लागतील, ज्याची किंमत 2,07,480 रुपये असेल. 

  • या आयपीओमध्ये 10 टक्के शेअर्स रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

  • 15 टक्के शेअर्स हाय नेटवर्थ गुंतवणूकदारांसाठी राखीव आहेत, तर पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIB - Qualified Institutional Buyer)  75 टक्के शेअर्स राखीव ठेवण्यात आले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Income Tax : नवी कर प्रणाली काय आहे? सूट मिळवण्यासाठी काय करावं लागेल?