Passenger Vehicle Sales Declines: मार्च महिन्यामध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. ऑटोमोबाईल कंपन्यांची संघटना असलेल्या सियामने (SIAM) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मार्च 2021 च्या तुलनेत देशातील प्रवासी वाहनांची विक्री चार टक्क्यांनी घसरून 2,79,501 युनिट्सवर आली आहे. मार्च 2021 मध्ये ऑटोमोबाईल कंपन्यांनी 2,90,939 प्रवासी वाहने विकली होती.


सियामच्या आकडेवारीनुसार मार्चमध्ये दुचाकींच्या विक्रीतही घट झाली आहे. मार्च 2022 मध्ये, टू व्हीलरची विक्री 21 टक्क्यांनी घसरून 11,84,210 युनिट झाली, तर मार्च 2021 मध्ये एकूण 14,96,806 दुचाकींची विक्री झाली. या कालावधीत बाईकची विक्री 9,93,996 युनिट्सवरून 21 टक्क्यांनी घसरून 7,86,479 युनिट्सवर आली आहे. स्कूटरच्या विक्रीतही घट झाली आहे. स्कूटरची विक्री 21 टक्‍क्‍यांनी घसरून 3,60,082 युनिट्सवर आली आहे. मागील वर्षी याच कालावधीत दुचाकी निर्मात्यांनी 4,58,122 युनिट्सची केली होती.


आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये वाहनांची एकूण विक्री 13 टक्क्यांनी वाढून 30,69,499 वाहनांवर पोहोचली आहे. जी 2020-21 मध्ये 27,11,457 वाहने इतकी होती. मात्र गेल्या आर्थिक वर्षात दुचाकींची एकूण विक्री 11 टक्क्यांनी घसरून 1,34,66,412 इतकी झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात दुचाकींची विक्री 1,51,20,783 युनिट्स इतकी होती.


आर्थिक वर्षात तीन चाकी वाहनांची विक्री वाढून 2,60,995 युनिट्स झाली आहे. जी मागील आर्थिक वर्षात 2,19,446 युनिट्स होती. व्यावसायिक वाहनांची विक्री 5,68,559 युनिट्सवरून 7,16,566 युनिट्सपर्यंत वाढली.  2021-22 आर्थिक वर्षात विविध सेगमेंटमधील वाहनांची एकूण विक्री 1,75,13,596 युनिट्सवर घसरली. 2020-21 मध्ये वाहन विक्रीचा एकूण आकडा 1,86,20,233 युनिट्स होता.


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI