Railway Concession to Senior Citizen : रेल्वे मंत्रालय (Ministry of Railway) यात्रेकरुंचा ट्रेन प्रवास सुखकर करण्याच्या विचारात आहे. रेल्वे मंत्रालयाकडून प्रवाशांना रेल्वे भाड्यात सूट देण्याचा विचार सुरु आहे. भारतीय रेल्वेकडून (Indian Railway) ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, खेळाडू यांसारख्या इतर काही श्रेणींच्या प्रवाशांना रेल्वे भाड्यात सूट दिली जायची. पण कोरोना काळात ही सूट देणं रेल्वे मंत्रालयाने बंद केलं होतं. आता कोरोनाचा (Covid-19) धोका कमी झाली असल्याने रेल्वे मंत्रालयाकडून प्रवासी भाड्यामधील सूट पुन्हा सुरु करण्याचा विचार आहे.


कोरोनाकाळात रेल्वेच्या उत्पन्नात लक्षणीय घट


ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात रेल्वे प्रवास पुन्हा केव्हा सुरु होईल असा प्रश्न संसदेत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना विचारण्यात आला. यावर रेल्वे मंत्र्यांनी लेखी स्वरुपात उत्तर दिलं. रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं की, कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षात रेल्वेच्या उत्पन्नात लक्षणीय घट झाली आहे. गेल्या दोन वर्षात मिळालेले उत्पन्न 2019-20 आर्थिक वर्षातील उत्पन्नापेक्षाही कमी आहे. यामुळे रेल्वेवर मोठा आर्थिक परिणाम झाला आहे. 


सवलतीच्या तिकीटांचा बोजा


कोरोनामुळे रेल्वेच्या उत्पन्नात मोठी घट झाली असताना तिकीटांवरील सवलतीचा परिणाम उत्पन्नावर होऊन वाईट परिणाम होईल. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सवलतीच्या तिकीटांची सेवा सुरु करणं सध्या शक्य नाही.


लवकरच सवलत सुरु करण्याच्या विचारात


कोरोना महामारीच्या उद्रेकानंतर आता अर्थव्यवस्था रुळावर येत आहे. त्यामुळे येत्या काळात सकारात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास रेल्वे मंत्रालयाकडून पुन्हा सवलतीच्या तिकीटांची सेवा सुरु करण्याचा वितार आहे. दरम्यान, रेल्वे भाड्यात सवलतींच्या मुद्द्यावरून विरोधकांनी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरलं होतं. सरकारला विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या