Mumbai Local Megablock : मुंबईकरांनो (Mumbai) रविवारी (24 जुलै) घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल, तर लोकलचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा. मध्य रेल्वेवर  रविवारी मेगाब्लॉक (Central Railway Mega Block) घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामामुळे मेगाब्लॉक (Megablock) घेतला जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या (Central Railway) वतीनं देण्यात आली आहे. मध्य रेल्वे मार्गावर भायखळा - माटुंगा अप आणि डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक असेल. अप जलद मार्गावर शनिवारी रात्री 11.30 पासून दि. रविवारी पहाटे 4.05 पर्यंत हा मेगाब्लॉक असेल. तर डाऊन मार्गावर रविवारी मध्यरात्री 12.40 ते पहाटे 5.40 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. 


ट्रान्स हार्बर मार्गावरही मेगा ब्लॉक असेल. पनवेल -  वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर रविवारी सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत (बेलापूर - खारकोपर BSU मार्गा व्यतिरिक्त) मेगाब्लॉक घेण्यात येईल. ट्रान्सहार्बर मार्गावरील पनवेल येथून रविवारी सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटून ठाण्याकडे जाणारी अप सेवा आणि ठाणे येथून 10.01 पासून दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेलकरीता सुटणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर - खारकोपर आणि नेरुळ - खारकोपर दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - वाशी सेक्शन मध्ये विशेष लोकल चालविण्यात येतील. ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सेवा उपलब्ध असतील.


वळवण्यात आलेल्या उपनगरीय गाड्यांचे वेळापत्रक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रविवारी 24 जुलै रोजी सकाळी 5.20 वाजता सुटणारी डाउन जलद मार्गावरील सेवा भायखळा आणि माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि वेळेपेक्षा 10 मिनिटे उशिराने सुरु असेल.


मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक



  • ट्रेन क्रमांक12051 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस भायखळा आणि माटुंगा स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. दादर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 येथे दुहेरी थांबा देण्यात येईल आणि 10 ते 15 मिनिटे उशिराने धावेल.

  • गाडी क्रमांक 11058 अमृतसर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, 11020  कोणार्क एक्सप्रेस आणि 12810 हावडा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल  माटुंगा आणि  भायखळा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. या गाडीला दादर, प्लॅटफॉर्म क्रमांक 3 येथे दुहेरी थांबा दिला जाईल आणि गंतव्यस्थानी 10 ते 15 मिनिटे उशीरा पोहोचेल.