Gold Rate Today : मागील दोन आठवड्यांपासून आपण पाहात होतो सोन्या-चांदीचे (Gold-Silver Rate) दर वाढतच जात होते. 24 कॅरेट सोन्याने तर चक्क 70,000 पार केले होते. तसेच, 1 किलो चांदीच्या दराने 80,000 पार केले होते. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना देखील सोने-चांदी खरेदी करण्यास अडचण येत होती. मात्र, आता ऑग्सट महिना काही दिवसांवरच आहे. आणि ऑगस्ट महिना म्हटला की सण हे आलेच. श्रावण महिना अवघ्या काही दिवसांवर आहे. या निमित्ताने स्त्रियांना सणवारानिमित्त दागिने खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.90 टक्क्यांनी घसरून 24 कॅरेट सोन्याचा दर 51,560 रूपयांवर आला आहे. तर, 1 किलो चांदीचा दर 56,710 रूपयांवर व्यवहार करत आहे. तुमच्या शहरातील आजचे सोन्या-चांदीचे जर नेमके काय आहेत ते जाणून घ्या. 

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर : 

शहर सोने 1 किलो चांदीचा दर 
मुंबई  47,263 56,710
पुणे 47,263 56,710
नाशिक  47,263 56,710
नागपूर 47,263 56,710
दिल्ली 47,181 56,620
कोलकाता  47,199 56,640

तुमच्या शहराचे दर तपासा :

तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता. 

महत्वाच्या बातम्या :