Pakistan News : सध्या आपल्या शेजारचा देश पाकिस्तान (Pakistan) मोठ्या आर्थिक संकटात (economic crisis) सापडला आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. अर्थव्यवस्था कोलमडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ ( Shehbaz Sharif) या स्थितीतीन पाकिस्तानला बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. देशाची आर्थिक स्थिती बदलण्याचे वचन त्यांनी पाकिस्तानातील जनतेला दिले आहे. यासाठी ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची निती अवलंबणार आहेत.
देशाच्या खर्चात कपात करुन स्वावलंबनाकडे वाटचाल
पाकिस्तानला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नवाज शरीफ प्रयत्न करत आहेत. या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी आता नवीन पाऊल उचललं आहे. शरीफ यानी मंत्रीमंडळाच्या बैठकीत पंचवार्षिक योजना सामायिक करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या खर्चात कपात केली पाहिजे आणि देशाला स्वावलंबनाकडे नेलं पाहिजे असे मत शरीफ यांनी व्यक्त केले आहे. त्यादृष्टीनं पाकिस्तान प्रयत्न करणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशाला आत्मनिर्भर करण्याचा संकल्प केला होता. आज त्याच संकल्पाने देशाची वाटचाल होत असल्याचे चित्र दिसत आहे. देशाच्या विकासाचा वेग असाच राहिला तर भारत लवकरच जगातील तिसरी मोठी आर्थव्यवस्था होण्याची शक्यता आहे.
कृषी आणि माहिती तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रात वाढ करण्याचा पाकिस्तानचा संकल्प
पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ ( Shehbaz Sharif) यांनी देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी विविध प्रयत्न सुर केलेत. यातीलच एक प्रयत्न म्हणजे देशाची स्वावलंबनाकडे वाटचाल सुरु करणे हे आहे. यासाठी कृषी आणि माहिती तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रात वाढ करण्याचा संकल्प पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केला आहे. तसेच देशातून निर्यात वाढवण्यासाठी वाणिज्य मंत्रालय आवश्य ती पानले उचलणार असल्याची माहिती देखीळ शरीफ यांनी दिली आहे. या सर्व गोष्टीमुळं देशाची आस्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.
महत्वाच्या बातम्या: