Onion News : सध्या राज्यातील कांदा (Onion) उत्पादक शेतकरी (Farmers) संकटात सापडला आहे. कारण, कांद्याच्या दरात दिवसेंदिवस घसरण होताना दिसत आहे. सरकारनं घेतलेल्या निर्यातबंदीच्या निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. निर्यातबंदीमुळे बहुतांश शेतकऱ्यांना सध्या किलोला 1 रुपये ते 8 रुपये किलोपर्यंत भाव मिळत आहे. अतका दर कमी होऊनही सरकार निर्यातबंदीचा निर्णय मागे घेत नाही. याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.


कांद्याची आवक कमी होऊनही कांद्याला चांगला दर नाही


महाराष्ट्रातील बाजारपेठेत कांद्याची आवक कमी होऊनही शेतकऱ्यांना रास्त चांगला दर मिळत नाही. लोकसभेच्या  निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळं सरकारला कांद्यावरील निर्यातबंदी उठवायची नसल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. कोणत्याही शेतमालाचे भाव वाढू द्यायचे नाहीत असं सरकारचं धोरण दिसत आहे. राज्यातील सोलापूरसह राहुरी बाजार समितीत कांद्याला केवळ 1 ते 8 रुपये प्रतिकिलोचा किमान भाव मिळत आहे. आता राज्यातील शेतकरी कांद्याची शेती सोडून इतर पिकांची लागवड करत आहेत. कांदा निर्यातबंदीमुळे बहुतांश शेतकऱ्यांना 1 रुपये ते 8 रुपये किलोपर्यंत भाव मिळत आहे. यानंतरही सरकार निर्यातबंदीचा निर्णय मागे घेत नाही. याचाच अर्थ शेतकऱ्यांना आता मोफत कांदा वाटावा, अशी सरकारची इच्छा असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 


या बाजारांमध्ये भाव खूपच कमी 


10 फेब्रुवारी रोजी सोलापूरच्या बाजारात केवळ 34250 क्विंटल कांद्याची आवक झाली, तरीही येथील किमान भाव 100 रुपये प्रतिक्विंटल राहिला. तर एक लाख क्विंटलहून अधिक आवक होण्यासाठी हाच भाव होता. 8 फेब्रुवारी रोजी येथे कमाल भाव 1800 रुपये होता तर सरासरी भाव 1000 रुपये प्रतिक्विंटल होता. राहुरी मंडईत केवळ 5658 क्विंटल कांद्याची आवक झाली असूनही किमान भाव 100 रुपये प्रतिक्विंटल राहिला आहे. तर कमाल भाव 1500 रुपये तर सरासरी भाव 900 रुपये प्रतिक्विंटल होता. दुसरीकडे मनमाड मंडईत अवघी चार हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. असे असतानाही शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल केवळ 200 रुपये किमान भाव मिळाला. कमाल भाव 1300 रुपये तर सरासरी भाव 1000 रुपये प्रतिक्विंटल होता. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने 7 डिसेंबरला देशांतर्गत कांद्याचा पुरवठा व्हावा व दर नियंत्रित करण्यासाठी निर्यातबंदीचा निर्णय घेतला होता. नाशिक जिल्ह्यात लासलगाव, पिंपळगाव बसवंत या बाजार समित्यांमध्ये कांदा निम्याहून अधिक दराने कोसळल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे.


महत्वाच्या बातम्या:


Onion Export Ban : कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचे तब्बल हजार कोटीचे नुकसान, विवाह सोहळ्यांनाही बसला फटका