PF Money in Medical Emergency : आपले आरोग्य चांगले असले तरीही जीवनाच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर अचानक रुग्णालयात जावे लागते. कधी कोणती दुर्घटना होईल किंवा कुटुंबाचा एखादा सदस्य आजारी पडेल आणि याबाबतीत एखाद्या डॉक्टरकडे जावे लागेल किंवा रुग्णालयाच्या फेऱ्या माराव्या लागतील, हे सांगता येत नाही. सध्याच्या घडीला कोणत्याही क्षणी आपल्याला रुग्णालयात जावे लागू शकते. अशावेळी खिशात पैसे नसतील तर धावपळ होते. पण नोकरी करणाऱ्यांना एक अशी सुविधा आहे, त्यामुळे गरज पडल्यास एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम अवघ्या तासभरात मिळू शकते. पाहूयात या योजनेबाबत...


एक तासांत कशी मिळणार लाख रुपयांची मदत –
आपत्कालीन गरज लक्षात घेता तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधून एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकता. एक जून 2021 रोजी केंद्र सरकारने याबाबतचे सर्कुलर जारी केले होते. ईपीएफओ (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) सदस्य आपल्या पीएफ खात्यामधून मेडिकल इमरजेंसीसाठी एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकतो.  


पीएफ खात्यामधून मेडिकल इमरजेंसीमध्ये पैसे काढण्याची सुविधा आहे. एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकतो.   पीएफमधून रक्कम काढण्यासाठी पूर्वी तीन ते सात दिवस लागत होते, पण आता फक्त एक तासाच्या आतमध्ये तुमच्या बँक खात्यात रक्कम जमा होते. केंद्र सरकारने जूनमध्ये नियमांत मोठा बदल केला होता. यामध्ये कोविड हॉस्पिटलाइजेशनचाही समावेश आहे.


पीएफमधून कसे काढाल पैसे -


www.epfindia.gov.in संकेतस्थळावर जा..
संकेतस्थळावर वरती ऑनलाइन एडव्हांस क्लेम वर क्लिक करा.
https://unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface  या लिंकवर तुम्ही जाल.
ऑनलाइन सेवावर जा आणि त्यानंतर क्लेम (फॉर्म -31,19,10 सी आणि 10 डी) भरावा लागले.
बँक खात्याचे अखेरची चार अंक पोस्ट करा ... खाते व्हेरिफाय करा..  
Proceed for Online Claim वर क्लिक करा
ड्रॉप डाउनमधून PF Advance हा पर्याय निवडा (Form 31)
पैसे काढण्याचे कारण निवडा...
हवी ती रक्कम टाका
चेकची स्कॅन कॉपी अपलोड करा...
पत्ता टाका
Get Aadhaar OTP वर क्लिक करा...  आधार लिंक्ड मोबाइल वर आलेला OTP पोस्ट करा
तुमचा क्लेम फाईल झाल्यानंतर अन् त्याला दुजोरा मिळाल्यानंतर एक तासभराच्या आतमध्ये खात्यावर पैसे जमा होतील.


कोणती कागदपत्रे जमा करावी लागतील?
हा क्लेम करताना तुम्हाला कोणतेही बिल जमा करण्याची गरज नाही. तुम्हाला पीएफवरुन मेडिकल एडव्हांससाठी अप्लाय करायचे आहे... त्यानंतर अवघ्या तासभरात तुम्हाला पैसे मिळतील.


 या गोष्टी लक्षात ठेवाच....
हा मेडिकल एडव्हांस पीएफ खातेदाराच्या अथवा त्याच्या परिवारातील लोकांसाटी आहे. पेशेंटला सरकारी अथवा पब्लिक सेक्टर यूनिट (PSU) किंवा CGHS पॅनलवरील रुग्णालयात दाखल हवे. जर खासगी रुग्णालयात दाखल असेल तर संबंधित अथॉरिटी याची चौकशी करेल आणि पीएफमधील पैसे द्यायचे की नाही, याचा विचार करेल.