मुंबई : अनेक लोक असतात की ज्यांना जुन्या नोटा, नाणी जमा करण्याची आवड असते. त्यांचा हा छंद त्यांना लखपती किंवा करोडपती बनवू शकतो. जुन्या नोटा आणि नाणी जितक्या जुन्या होतात तितकी त्यांची किंमत वाढत जाते. काही वेबसाइट्स आहेत जिथे 1 रुपयांची नोट किंवा नाणे खरेदी करण्यासाठी लाखो रुपये देण्यास लोक तयार असतात. जर तुम्हाला नाणी किंवा नोटा जमा करण्याचा छंद असेल तर हा छंद काही वर्षानंतर तुम्हाला फायदेशीर ठरु शकतो. अशीच भारतात एक नोट होते ज्याचं मुद्रण ब्रिटिश काळात झालं होतं. म्हणजेच सन 1935 मध्ये ही 1 रुपयांची नोट छापली गेली होती.


या नोटमध्ये किंग जॉर्जचा (पाचवा) फोटो आणि जेडब्ल्यू केली यांची स्वाक्षरी आहे. या नोटेची किंमत जवळपास 40,000 रुपये आहे. विचार करा तुमच्याकडे अशा 2-3 नोटा असल्यास तुम्ही रातोरात लक्षाधीश व्हाल. यामध्ये केवळ आपल्याला नोटांची नाणी जमा करावी लागतील, एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. 


आता भविष्यातही असेच काही उत्पन्न मिळवायचे असेल तर आज पिग्गी बँक बनवा आणि त्यात दुर्मिळ नोटा, नाणी गोळा करण्यास सुरवात करा. देशात असे बरेच लोक आहेत जे अशा दुर्मिळ नोटा, नाणी घेण्यासाठी लाखो रुपये द्यायला तयार असतात.


त्याचप्रमाणे 1943  मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर सीडी देशमुख यांनी सही केलेल्या दहा रुपयांच्या नोटेसाठी लोक 50,000 रुपयांपर्यंत पैसे देण्यास तयार आहेत. आपल्याकडे दोन नोटा असल्यास कोणीही तुम्हाला लक्षाधीश होण्यापासून रोखणार नाही.  Ebay, कॉईनबाजार, इंडियन ओल्ड कॉईन आणि क्लिक इंडिया यासारख्या साईट्सवर लोक या नोटा, नाणी शोधत असतात. अशा नोटा आणि नाण्यांची बोली देखील लावली जाते.


विक्री कशी करावी


क्लिक इंडिया साईटवर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर थेट विक्रीसाठी एक लिंक मिळेल. यावर आपण विक्रेता म्हणून नोंदणी करू शकता आणि आपल्या जवळील नोट विकू शकता. त्यांना विक्री करण्यासाठी आपल्याला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. आपण थेट विक्रेता म्हणून स्वत: ची नोंदणी करा आणि त्यानंतर आपल्याकडे असलेल्या नोटेचा फोटो अपलोड करा. त्यानंतर लोक तुम्हाला स्वतःच संपर्क साधतील.