Adani Group Shares : नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (NSE - National Stock Exchange) अदानी समूहावर (Adani Group) करडी नजर आहे. NSE ने अदानी समूहाच्या (Adani Group) तीन कंपन्यांचे शेअर्स देखरेखीखाली ठेवले आहेत. शेअर बाजारातील अस्थिरता रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अदानी समुहाच्या अदानी एंटरप्रायझेस (Adani Enterprises), अदानी पोर्ट्स (Adani Ports) आणि अंबुजा सिमेंट्स (Ambuja Cements) या शेअर्सवर अतिरिक्त पाळत ठेवण्याच्या उपाययोजना (ASM) अंतर्गत करण्यात आल्या आहे. यामुळे अस्थिरता रोखण्यासाठी मदत होईल, अशी NSE ला अपेक्षा आहे. 


अदानी ग्रुपचे तीन शेअर्स NSE च्या देखरेखीखाली


NSE ने ASM फ्रेमवर्क (Additional Surveillance Measure) म्हणजे अतिरिक्त पाळत ठेवण्याच्या उपायोजनांमध्ये अदानी ग्रुपचे तीन शेअर्स ठेवले आहेत. NSE ने अदानी समूहाचं स्टॉक्सचे मॉनिटरिंग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे इंट्राडे ट्रेडिंगसाठी देखील 100 टक्के अपफ्रंट मार्जिन आवश्यक असेल आणि यामुळे शॉर्ट सेलिंगला आळा बसेल. याचा उद्देश अदानी समूहाच्या शेअर्समधील अस्थिरता कमी करणे हा आहे, यासोबतच या शेअर्सवर देखरेखही वाढणार आहे.


अदानी समूहाचं मोठं नुकसान


गौतम अदानी यांच्या अदानी समूहाला गेल्या काही दिवसांत मोठे नुकसान झाले आहे. अदानी (Adani Group) समूहाला आठवड्याभरात शंभर अब्ज डॉलरचं नुकसान झाल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. शंभर अब्ज डॉलर ($100 Billion) म्हणजे सुमारे 8.23 लाख कोटी. अदानी समूहाच्या भांडवली बाजारातील मूल्यातही (Cumulative Market Capitalization Loss) घसरण झाली आहे.  


ASM फ्रेमवर्क म्हणजे काय?


नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (NSE) गुरुवारी ASM फ्रेमवर्कमध्ये अदानी समूहाचे तीन शेअर्स ठेवण्याची घोषणा केली आहे. ASM फ्रेमवर्क (Additional Surveillance Measure) म्हणजे अतिरिक्त पाळत ठेवण्याच्या उपायोजना. शेअर्समधील अस्थिरता कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. या तीन कंपन्यांमध्ये अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट आणि अंबुजा सिमेंट यांचा समावेश आहे. याचा अर्थ असा की इंट्राडे ट्रेडिंगसाठी 100 टक्के अपफ्रंट मार्जिन देखील आवश्यक असेल आणि यामुळे शॉर्ट सेलिंगला आळा बसेल. 


शेअर्समधील अस्थिरता कमी करण्यासाठी NSE चा निर्णय


अदानी समूहाच्या शेअर्समधील अस्थिरता कमी करण्याच्या प्रयत्नाअंती NSE ने हे पाऊल उचललं आहे. यासोबतच या शेअर्सवर देखरेखही वाढणार आहे. हा नवीन नियम शुक्रवारपासून 3 फेब्रुवारी 2023 पासून लागू होईल. हिंडनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये झपाट्याने घसरण झाली आहे. त्यानंतर स्टॉक एक्सचेंजने हे पाऊल उचलले आहे. अदानी समूहाला आतापर्यंत 100 अब्ज डॉलरहून अधिक नुकसान झाले आहे.