नवी दिल्ली : नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं मोठा निर्णय घेतला आहे. एनपीसीआयनं सायबर गुन्हेगारांना पायबंद घालण्यासाठी कलेक्टरिक्वेस्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एनपीसीआयचा हा निर्णय सायबर गुन्हेगारांवर सर्जिकलस्ट्राईक मानला जात आहे.
एनपीसीआयनं सर्व बँका आणि पेमेंटस ॲप्सला (गुगलपे, फोनपे आणि पेटीएम) ला 1 ऑक्टोबर 2025 पासून यूपीआयवरीलपीयर-टू-पीयर (P2P) कलेक्टरिक्वेस्ट पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळंऑनलाईन फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांवर हा सर्जिकलस्ट्राइक मानला जातोय. ज्यामुळंकोट्यवधी सामान्य यूपीआयवापरकऱ्यांचे पैसे सुरक्षित राहणार आहेत.
कलेक्टरिक्वेस्ट म्हणजे काय?
कलेक्टरिक्वेस्ट किंवा पूल ट्रांझॅक्शन हे यूपीआयचंफीचर आहे. ज्याद्वारे तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला पैसे मागू शकता. उदा. तुम्हाला तुमच्या एखाद्या मित्राकडून 500 रुपये घ्यायचे आहेत. तेव्हा तुम्ही यूपीआय ॲप्समध्ये तुमच्या मित्राचा यूपीआयआयडी टाकून त्याला 500 रुपयांचीकलेक्टरिक्वेस्ट पाठवू शकता. यानंतर तुमच्या मित्राकडे त्याचं नोटिफिकेशन जातं. तिथून तो यूपीआयपिन टाकून ते मंजूर करेल तेव्हा 500 रुपये तुमच्या खात्यात येतील. हे फीचर नातेवाईकांना दिलेले पैसे परत घेण्यासाठी बनवण्यात आले होते. सायबर गुन्हेगारांनी कलेक्टरिक्वेस्टचा वापर फसवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर केला होता.
सायबर गुन्हेगार फोनकरुनयूपीआयवापरकर्त्यांनालॉटरी, कॅशबॅक, नोकरी किंवा ऑनलाइनप्लॅटफॉर्मवर वस्तू विक्री करण्याच्या नावानं फसवणूक करायचे. ते सांगायचे तुम्हाला पैसे पाठवत आहोत, तुमच्या फोनवर आलेली रिक्वेस्ट मंजूर करा, ती रिक्वेस्ट मंजूर केल्यानंतर सामान्य यूपीआयवापरकर्त्यांची फसवणूक केली जायची.
लाखो लोकांची फसवणूक होत असल्यानंएनपीसीआयनं मोठं पाऊल उचललं आहे. एनपीसीआयन स्पष्ट केलं की 1 ऑक्टोबर 2025 नंतर यूपीआयP2P कलेक्टचीयूपीआयप्रोसेस करता येणार नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या नेहमीच्या यूपीआय वापरावर याचा परिणाम होणार नाही. ते नियमितपणे पेमेंटकरु शकतात. P2P कलेक्टरिक्वेस्ट बंद करण्यात आली असली तरी मर्चंटकलेक्टरिक्वेस्ट पाठवू शकतात.
जेव्हा तुम्ही फ्लिपकार्ट, अमेझॉन, स्विगी, आयआरसीटीसी, एसटी तिकीट बुकिंग करत असाल आणि यूपीआयपेमेंटऑप्शन निवडत असाल तर या कंपन्या तुमच्या यूपीआय ॲप वर एक पेमेंटरिक्वेस्ट पाठवतात. ती तुम्हाला पिन टाकून मंजूर करावी लागते.
एनपीसीआयनं यापूर्वी फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी कलेक्टरिक्वेस्टची मर्यादा घटवून2000 रुपये प्रति व्यवहार केली होती. त्यामुळं फसवणुकीच्या घटना कमी झाल्या होत्या. मात्र, सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या मार्गानं लोकांना फसवत होते. याला पायबंद घालण्यासाठी एनपीसीआयनं P2P कलेक्टरिक्वेस्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातयूपीआयचे40 कोटी यूजर्स आहेत. दरमहा 1946 कोटींहून अधिक व्यवहार होतात.
