मुंबई : येत्या काळात युपीआयच्या (UPI) माध्यमातून कोणत्याही बँक खात्यातून अन्य कोणत्याही बँक खात्यामध्ये पैसे जमा करता येणार आहेत. युपीआयच्या माध्यमातून हे शक्य होणार आहे. ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये तशाप्रकारचं तंत्रज्ञान एनपीसीआय (NPCI) आणि कॅनरा बँकेच्या (Canara Bank) माध्यमातून बाजारात आणलं जाणार आहे. नेमकं युपीआयच्या माध्यमातून हे कसं काम करणार आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? हे जाणून घेऊ या...  


एनसीएमसीच्या माध्यमातून होणार कार्डचा वापर


वन वेशन वन कार्डच्याच धर्तीवर तुम्हाला संपूर्ण देशात मेट्रो, बस, पार्किंग आणि फेरीसाठी एकच कार्ड वापरता येणार आहे. एनसीएमसीच्या (नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड) माध्यमातून या कार्डचा वापर होऊ शकणार आहे. एनपीसीआय, रुपे कार्ड आणि ऑन गो राईडनं हा संयुक्त उपक्रम आणला आहे.  


बँक खात्यातील पैसे वापरायला देऊ शकाल


एनपीसीआयनं BHIM ॲपच्या माध्यमातून युपीआय विथ सर्कल हे नवं फिचर आणल आहे. ज्यात तुमच्या बँक अकाऊंटचा ॲक्सेस या फिचरच्या माध्यमातून तुम्ही देऊ शकणार आहात. मुलाला पॉकेटमनी द्यायची असेल, बायकोला पैसे द्यायचे असतील किंवा दर महिन्याला भावाला पैसे पाठवायचे असतील तर या फिचरच्या माध्यमातून त्यांना ॲड करुन तुम्ही युपीआयनं त्यांना बँक खात्यातील पैसे वापरायला देऊ शकणार आहात. मात्र, नेमके किती पैसै वापरायचे, सोबतच त्याचा ॲक्सेस पूर्णवेळ द्यायचा की एका ट्रॅन्झॅक्शनकरीता याची कमान तुमच्या हाती असणार आहे.


एनपीसीआय आणि कॅनरा बँक आणत असलेल्या या नव्या तंत्रज्ञानामुळे हा व्यवहार शक्य होणार आहे.  आगामी काळात या फिचरबद्दल अधिक माहिती समजेल.    


हेही वाचा :


Lek Ladki Yojana : 'लाडक्या बहिणीं'ना 1500 तर 'लाडक्या लेकीं'ना 101000; 'लेक लाडकी' योजना आहे तरी काय?


लाडक्या बहिणींना दुसऱ्या टप्प्यात 3000 मिळण्यास सुरुवात, मग 4500 रुपये कोणाला भेटणार? जाणून घ्या लाभ नेमका कसा मिळतोय?


Lek Ladki Yojana : 'लाडक्या बहिणीं'ना 1500 तर 'लाडक्या लेकीं'ना 101000; 'लेक लाडकी' योजना आहे तरी काय?