BHIM App: बरेचदा डिजिटल पेमेंट करताना महिनाअखेरीस बँक (Bank) खात रिकामं असतं आणि अशा वेळी तुमच्याकडे पर्याय असतो तो म्हणजे क्रेडिट कार्डचा (Credit Card). पण क्युआर कोड (Qr Code) वापरुन तुम्ही डिजिटल पेमेंट करता येत नाही. पण तुम्ही डिजिटल पेमेंटसाठी रुपे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही शेजारच्या किराणा दुकानात UPI QR कोड स्कॅन करून क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरण्यास सहजपणे भरु शकणार आहात. आतापर्यंत बँक खाते युपीआय अॅपशी लिंक करून पेमेंट करण्याची सुविधा होती. यामध्ये आता काहीसा नाविन्यपूर्ण बदल होताना दिसतो आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे  (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बुधवारी ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलमध्ये UPI सुविधेवर रुपे क्रेडिट कार्ड लाँच केले. जून महिन्यातच एमपीसीच्या बैठकीनंतर आता क्रेडिट कार्ड UPI शी लिंक करून पेमेंट करता येईल असं आरबीआयने सांगितले होतं  कुठल्या बँकांच्याद्वारे लाभ? क्रेडिट कार्ड मार्केटमध्ये मास्टरकार्ड आणि व्हिसा यांचे वर्चस्व असले तरी बहुतेक वापरकर्त्यांना UPI द्वारे क्रेडिट कार्ड पेमेंटची सुविधा मिळेल. सध्या या सुविधेचा लाभ पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँकेचे रुपे क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी उपलब्ध असेल. या तिन्ही बँकांची रुपे क्रेडिट कार्डे NPCI द्वारे संचालित BHIM अॅपवर लाइव्ह झाली आहेत. क्रेडिट कार्ड BHIM अॅपशी लिंक करण्याची प्रक्रिया

1) सर्व प्रथम BHIM अॅप उघडा.
2) तुमचे रुपे क्रेडिट कार्ड आता लिंक करा किंवा लिंक केलेल्या बँक खात्यावर क्लिक करा.
3) बँकेत क्रेडिट कार्ड किंवा पंजाब नॅशनल बँक किंवा युनियन बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँक प्रविष्ट करा.
4) आता संबंधित कार्डवर क्लिक केल्यावर मोबाइल नंबरशी लिंक केलेल्या क्रेडिट कार्डचा तपशील येईल.
5) आता क्रेडिट कार्डचे शेवटचे ६ अंक आणि वैधता टाका.
6) यानंतर मोबाईलवर आलेला OTP टाका.
 
7) UPI पिन तयार करा. अशा प्रकारे नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
8) आता UPI QR कोड स्कॅन करा आणि कार्ड निवडा आणि UPI पिन टाकून पेमेंट पूर्ण करा. शुल्कात स्पष्टता नाही
हाती आलेल्या माहितीनुसार युपीआयशी क्रेडिट कार्ड लिंक करून UPI पेमेंट करण्यासाठी कोणताही MDR आकारला जाणार नाही. एक लहान इंटरचेंज शुल्क आकारले जाईल. परंतु याबाबत पूर्णपणे स्पष्टता देण्यात आलेली नाही.