Bank News: बँकेत (Bank) व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. तुमचे जर पंजाब नॅशनल बँकेत (PNB) खाते असेल तर तुम्हाला सावधान व्हावं लागेल. कारण, पंजाब नॅशनल बँकेनं आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केलाय. बँकेनं दिलेल्या माहितीनुसार काही ग्राहकांची खाती बंद केली जाणार आहेत. खात्यांचा कोणत्याही प्रकारे गैरवापर होऊ नये म्हणून निर्णय घेतला जाणार आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 


पंजाब नॅशनल बँकेनं (PNB) मोठा निर्णय घेतलाय. गेल्या तीन वर्षात कोणत्याही प्रकारचे व्यवहार झाले नसलेली आणि शून्य शिल्लक असलेली बँक खाती एका महिन्यानंतर बंद करण्यात येणार आहेत. ज्या खात्यावरुन कोणत्याही प्रकारचे व्यवहार होत नाहीत, ती खाती बंद केली जाणार आहेत. कोणत्याही प्रकारचा गैरवापर होऊ नये म्हणून ही दक्षता घेण्यात येत आहे. त्यामुळं ज्या ग्राहकांची पंजाब नॅशनल बँकेत खाती आहेत, त्यांनी याबाबतची सविस्तर माहिती घेणं गरजेचं आहे.


डिमॅट खाती बंद करण्यात येणार नाहीत


दरम्यान, पंजाब नॅशनल बँकेनं खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. अनेक घोटाळा करणारे लोक व्यवहार होत नसलेल्या खात्यांचा गैरवापर करतात. त्यामुळं बँकेनं कोणत्याही प्रकारचा खात्यांचा गैरवापर होऊ नये म्हणून खाती बंद करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, खात्यांची गणना 30 एप्रिल 2024 च्या आधारावर केली जाणार आहे. बँक डिमॅट खाती बंद करण्यात येणार नाहीत. ही नियम  डिमॅट खात्यांसाठी लागू होणार नाही. 


'ही' खाती बंद केली जाणार नाहीत


दरम्यान, मिळालेल्आ माहितीनुसार, सुकन्या समृद्धी योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना यासारख्या योजनांसाठी उघडण्यात आलेली खाती बंद केली जाणार नाहीत. त्याचबरोबर अल्पवयीनांचे बचत खातेही बंद होणार नसल्याची माहिती बँकेनं दिली आहे. दरम्य़ान, एखाद्या ग्राहकाचे व्यवहार न झालेले खाते जर बंद केले आणि ते खाते पुन्हा सुरु करायचे असेल तर करता येते का? असा प्रश्न तुमच्या मनात पडला असेल. तर याच उत्तर हो आहे. खाते पुन्हा सुरु करण्यासाठी ग्राहकांना शाखेत जाऊन केवायसी फॉर्म भरावा लागेल. तसेच केवायसी फॉर्मसोबत ग्राहकाला आवश्यक कागदपत्रेही सादर करावी लागणार आहेत. त्यानंतर त्यांचे खाते सुरु होणार आहे.


महत्वाच्या बातम्या: 


Bank FD Rates : 'या' सरकारी बँकांकडून व्याज दरात वाढ, एफडीवर 8.40 टक्क्यांपर्यंत व्याज दर; यादी पाहा