RBI Governor : आरबीआयने 2,000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी 7 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली होती. ती मुदत आता संपली आहे. त्यानंतर  RBI च्या 19 शाखांमध्ये नोटा जमा करण्याची आणि बदलण्याची सुविधा बंद करण्यात आली. 8 ऑक्टोबरपासून रिझर्व्ह बँकेच्या 19 कार्यालयांमध्ये लोकांना नोटा जमा करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांनी सविस्तर माहिती दिली आहे. 2000 रुपयांच्या नोटा परत येत आहेत. आता फक्त 10,000 कोटी रुपयांच्या नोटा लोकांकडे आहेत. या नोटाही जमा होतील, असा विश्वास त्यांनी दास यांनी व्यक्त केला. 


2000 रुपयांच्या नोटा आरबीआयच्या प्रदेश कार्यालयात जमा करण्याचे काम सुरु


2000 रुपयांच्या नोटेबाबत पुन्हा एकदा नवी माहिती समोर आली आहे. 2000 रुपयांच्या नोटेबाबत नवीन अपडेट स्वत: आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिले आहे. RBI ने बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची आणि बदलण्याची तारीख 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती. त्यानंतरही 2000 रुपयांच्या सर्व नोटा काही जणांनी जमा केल्या नाहीत. सध्या 2000 रुपयांच्या नोटा आरबीआयच्या प्रदेश कार्यालयात जमा करण्यात येत आहेत. 2000 रुपयांच्या नोटेबाबत आरबीआय गव्हर्नरने शक्तीकांत दास यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.


अद्यापही 10,000 कोटी रुपयांच्या नोटा लोकांकडे


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, 2,000 रुपयांच्या नोटा परत येत आहेत. आता फक्त 10,000 कोटी रुपयांच्या नोटा लोकांकडे आहेत. या नोटाही परत मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दिल्लीतील एका कार्यक्रमात  ते बोलत होते. 2,000 रुपयांच्या नोटा परत येत आहेत आणि सध्या बाजारात फक्त 10,000 कोटी रुपयांच्या नोटा शिल्लक आहेत. या नोटाही परत मिळतील अशी आशा असल्याचे दास म्हणाले. चलनातून काढण्यात आलेल्या 2,000 रुपयांच्या 87 टक्के नोटा बँकांमध्ये ठेवी म्हणून परत आल्या आहेत. 


या महिन्याच्या सुरुवातीला आरबीआयने 2,000 रुपयांच्या नोटा काढण्यासाठी विशेष मोहीम 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती. 7 ऑक्टोबरनंतर बँक शाखांमध्ये नोटा जमा करण्याची आणि बदलण्याची सुविधा बंद करण्यात आली. 8 ऑक्टोबरपासून लोकांना आरबीआयच्या 19 कार्यालयांमध्ये नोटा बदलून देण्याची किंवा त्यांच्या बँक खात्यात तितकीच रक्कम जमा करण्याची सुविधा देण्यात आली. व्यक्ती किंवा संस्था यांना 2,000 रुपयांच्या नोटा 20,000 रुपयांच्या मर्यादेपर्यंत एका वेळी 19 RBI कार्यालयांमध्ये बदलू शकतात. तथापी, RBI कार्यालयांद्वारे बँक खात्यांमध्ये 2,000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी रकमेवर मर्यादा नाही. RBI ने यावर्षी 19 मे रोजी चलनातून 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केली होती.