New Rules From 1st January 2023 : 2022 वर्ष लवकरच संपणार आहे. नव्या वर्षाची चाहूल ( New Year 2023 ) लागली आहे. काही दिवसांनी 2023 वर्षाला सुरुवात होईल. 2022 मधील शेवटचा डिसेंबर महिनाही अर्धा संपला आहे. काही दिवसांनी नवीन वर्षाला सुरुवात होईल. या नवीन वर्षात काही नियम बदलणार आहेत. या नियमांचा बदल तुमच्या खिशावरही पडणार आहे. नवीन वर्षात नव्याने लागू होणाऱ्या नियमांचा परिणाम तुमच्या बजेटवर होणार आहे. हे बदल कोणते ते जाणून घ्या.


क्रेडिट कार्डच्या नियमांत बदल


2023 वर्षात क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना रिवॉर्ड पॉईंट मिळतात. नवीन वर्षाआधी हे रिवॉर्ड पॉईंट रिडीम (Redeem) करुन घ्या. तसेच 1 जानेवारीपासून काही बँकांच्या क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉईंटच्या नियमांमध्येही बदल होणार आहे. असे रिवॉर्ड पॉईंट्स डिसेंबर महिन्यामध्येच वापरुन घ्या.


पॅन कार्ड आणि आधार लिंक करा (पॅन कार्ड आधार लिंक)


जर तुम्ही अजून पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नसेल तर हे काम लवकर पूर्ण करुन घ्या. आयकर विभागाने एप्रिल 2023 पर्यंत पॅन कार्ड आणि आधार लिंक करण्याची मर्यादा वाढवली आहे, पण यामध्ये उशीर झाल्यास तुमच्या बँकिंग अडचणी येऊ शकतात.


विमा प्रीमियम महागण्याची शक्यता


2023 या नवीन वर्षामध्ये विमा प्रीमियम ( Insurance Premium ) महाग होण्याची शक्यता आहे. IRDAI वाहनांचा वापर आणि देखभाल यावर आधारित विमा प्रीमियमसाठी नवीन वर्षात नवीन नियम लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. नवीन वर्षात लोकांना महागड्या विमा हप्त्यांचा झटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच या संदर्भातील नियोजन करुन घ्या.


CNG आणि PNG च्या किंमती बदलण्याची शक्यता


नवीन वर्षामध्ये सीएनजी आणि पीएनजीचे दर बदलण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून दर महिन्याच्या 1 तारखेचा इंधनाच्या नवीन किंमती जारी केल्या जातात. 2022 वर्षात नोव्हेंबर महिन्यामध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला होता. मात्र, व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली होती. नव्या वर्षी पेट्रोलियम कंपन्यांकडून कोणते नवे दर जारी केले जातात हे पाहावं लागेल.


महत्त्वाच्या इतर बातम्या