Business Idea : कोरोना (Covid19) महामारीनंतर देशातील बेरोजगारीचा दर झपाट्याने वाढला आहे. अशा परिस्थितीत, जर तुमची नोकरी देखील यामुळे गेली असेल, तर नवीन नोकरी शोधण्याऐवजी तुम्ही तुमचा व्यवसाय (New Business Plan) सुरू करू शकता. पण, व्यवसाय सुरू करण्याआधी, तुम्ही जो व्यवसाय सुरु करणार आहात त्याचे मार्केट डिमांड तपासणे खूप गरजेचे आहे. तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी पैसे कमी असतील आणि तुम्हाला जास्त नफा मिळवायचा असेल तर तुम्ही एलईडी (LED) बल्बचा व्यवसाय सुरू करू शकता.


भारतात एलईडी बल्बची बाजारपेठ मोठी आहे. आजकाल प्रत्येक घरात एलईडी बल्ब हे असतातच. जिथे CFL बल्ब फक्त 8 हजार तास चालतो, तिथे LED बल्बची लाईफ 50 हजार तास असते. एलईडी बल्बचा वापर केल्याने विजेचे बिलदेखील कमी येते. यामुळे विजेसारख्या अत्यावश्यक साधनांची बचत होण्यासही मदत होते. हा बल्ब प्लास्टिकचा असल्याने लवकर फुटतही नाही. बाजारात या बल्बला खूप मागणी आहे. (LED Bulb Demand) विशेष म्हणजे हा व्यवसाय उभारण्यासाठी सरकारकडून एलईडी बल्ब बनविण्याचे प्रशिक्षणही दिले जात आहे. 


सरकारकडून एलईडी बल्ब बनविण्याचे प्रशिक्षण :


या व्यवसायातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हा व्यवसाय अगदी कमी गुंतवणुकीत सुरु करू शकता. याबरोबरच हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून मदतही मिळते. तुम्हाला LED बल्ब बनविण्याचे प्रशिक्षण सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाकडून मिळते. याशिवाय एलईडी बल्ब बनविणाऱ्या कंपन्यांकडून बल्ब बनविण्याचे प्रशिक्षणही तुम्ही घेऊ शकता. या प्रशिक्षणा दरम्यान, बल्ब बनविण्याव्यतिरिक्त, तुम्हाला पीसीबीचे बेसिक, एलईडी ड्राईव्ह, बल्ब साहित्य खरेदी, फिटिंग-चाचणी, मार्केटिंग, सरकारी सबसिडी स्किम इत्यादी गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते.


व्यवसाय सुरु करण्यासाठी करावी लागेल इतकी गुंतवणूक :


जर तुम्हाला हा व्यवसाय लहान स्तरापासून सुरू करायचा असेल, तर तुम्ही फक्त 50,000 रुपयांच्या गुंतवणुकीने सुरू करू शकता. या कामासाठी तुम्हाला दुकानही उघडावे लागणार नाही. एक बल्ब बनवण्यासाठी 50 रुपये खर्च येईल, जो तुम्ही बाजारात 100 रुपये प्रति बल्ब विकू शकता. अशा प्रकारे तुम्ही दुप्पट नफा मिळवून दर महिन्याला 2000 बल्ब बनवून किमान 1 लाखाचा नफा कमावू शकता. 


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha