Direct Tax collections Data:  प्रत्यक्ष कर वसुलीत यंदा चांगलीच तेजी असल्याचे चित्र आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 9 जुलै 2023 पर्यंत एकूण कर वसुली 5.17 लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. मागील आर्थिक वर्ष 2022-23 च्या कालावधीच्या तुलनेत 14.65 टक्के अधिक आहे. अर्थ मंत्रालयाने याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. 


अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,  प्रत्यक्ष कर संकलनात प्रगती दिसून येत असून आणि 9 जुलैपर्यंत प्रत्यक्ष कर संकलन 5.17 लाख कोटी रुपये झाले आहे. हे कर संकलन मागील वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 14.65 टक्के अधिक आहे. परतावा वगळता, प्रत्यक्ष कर संकलन एकूण 4.75 लाख कोटी रुपये आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 15.87 टक्के अधिक आहे. एक तिमाही आणि काही कालावधीसाठी 2023-24 च्या प्रत्यक्ष कर संकलनाच्या अंदाजपत्रकाच्या 26.05 टक्‍के अधिक आहे. 






अर्थ मंत्रालयाने म्हटले की, एक एप्रिल 2023 पासून ते 9 जुलै 2023 पर्यंत करदात्यांना 42 हजार कोटी रुपयांचा रिफंड जारी करण्यात आला आहे. मागील वर्षाच्या याच कालावधीतील रिफंडच्या तुलनेत 2.55 टक्के अधिक आहे. सध्या आयकर भरण्यासाठीची लगबग सुरू आहे. अशातच आयकर विभागाने परदेश दौऱ्यावर सहजपणे जाण्याआधी आयकर रिटर्न भरणे का आवश्यक आहे, याची माहिती दिली आहे. 







आयकर विभागाने करदात्यांना 2023-24 साठी 31 जुलै 2023 पूर्वी आयकर रिटर्न भरण्याचे आवाहन केले आहे.


 


GST चोरी करणाऱ्यांना दणका! ईडी करणार कारवाई; सरकारनं उचललं मोठं पाऊल



केंद्र सरकारने जीएसटी चोरीला (GST Scam) आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे, यामुळे आता जीएसटी घोटाळ्यांना चाप बसेल. सरकारने वस्तू आणि सेवा कर (Goods and Services Tax) म्हणजेच जीएसटी (GST) आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) आणण्याचा मोठा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता जीएसटी चोरी करणाऱ्यावर अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) म्हणजे ईडीला (ED) कारवाई करता येणार आहे. यासंदर्भात सरकारने महत्त्वाची अधिसूचना जारी केली आहे. यामुळे आता जीएसटी चोरी करणाऱ्यांवर ईडीचा धाक असेल. जीएसटी चोरीच्या प्रकरणांमध्ये ईडीला थेट हस्तक्षेप करता येणार आहे.