Business Opportunity: तुम्हीही जर व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. केंद्र सरकारकडून व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. यामध्ये तुम्ही 50,000 रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळवू शकतात. ही मदत मिळवण्यासाठी कसं अप्लाय करायचं, हे आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

  


मुद्रा कर्ज योजना


केंद्र सरकारकडून अनेक विशेष योजना राबविण्यात येत असून, पंतप्रधान मुद्रा योजना ही त्यापैकी एक आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला कर्जाची सुविधा दिली जाते. यामध्ये तुम्हाला सहज कर्ज मिळू शकते. याची खास गोष्ट म्हणजे तुम्हाला कर्ज कोणत्याही हमीशिवाय मिळेल आणि तुम्हाला कोणतीही प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही.


मुद्रा कर्जावरील व्याजदर किती? (Mudra Loan Interest rate)


पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत कोणताही निश्चित व्याजदर नाही. मुद्रा कर्जासाठी बँका वेगवेगळे व्याजदर आकारू शकतात. साधारणपणे किमान व्याज दर 12 टक्के असतो.


3 प्रकारचे कर्ज उपलब्ध 


तुम्‍हाला पीएम मुद्रा कर्जाचा लाभ 3 टप्प्यात मिळू शकतो. यातील पहिला टप्पा म्हणजे शिशू कर्ज. याशिवाय दुसरा टप्पा किशोर कर्ज आणि तिसरा टप्पा युवा कर्ज आहे.


1. शिशु कर्ज योजना- या योजनेअंतर्गत तुम्हाला 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल.
2. किशोर कर्ज योजना- या योजनेतील कर्जाची रक्कम 50,000 ते 5 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.
3. युवा कर्ज योजना - युवा कर्ज योजनेत 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेतले जाऊ शकते.


कुठून घेऊ शकता हे कर्ज?


हे कर्ज तुम्ही सरकारी बँका, खाजगी बँका, परदेशी बँका, ग्रामीण बँका आणि सहकारी बँकांमधून कुठूनही घेऊ शकता. आरबीआयने 27 सरकारी बँका, 17 खाजगी बँका, 31 ग्रामीण बँका, 4 सहकारी बँका, 36 सूक्ष्म वित्त संस्था आणि 25 बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFCs) यांना मुद्रा कर्ज वाटप करण्यासाठी अधिकृत केले आहे.


कर्ज कसे मिळवायचे?


कर्ज घेण्यासाठी तुम्ही याची अधिकृत वेबसाइट http://www.mudra.org.in/ ला भेट देऊ शकता. येथून फॉर्म डाउनलोड करून, तुम्हाला सर्व तपशील भरावे लागतील आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. बँकेचे शाखा व्यवस्थापक तुमच्याकडून कामाची माहिती घेतात. त्या आधारावर PMMY तुम्हाला कर्ज मंजूर करते.