Yongest Millionaire News : एका 4 महिन्यांच्या बाळाच्या नावावर 15 लाख शेअर्स आहेत. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या Infosys कंपनीचे प्रमुख नारायण मुर्ती (Narayan Murthy ) यांच्या नातवाच्या नावावर 15 लाख शेअर्स आहेत. या शेअर्सची किंमत 240 कोटी रुपये आहे. यामुळं नारायण मुर्ती यांचा नातू जगातील सर्वात तरुण करोडपती (Yongest Millionaire ) झाला आहे.
एकाग्र मुर्तीचा Infosys कंपनीत 0.04 टक्के हिस्सा
Infosys कंपनीचे प्रमुख नारायण मुर्तींचा मुलगा रोहन मुर्ती यांचा मुलगा एकाग्र मुर्ती (Ekagrah Rohan Murthy) याच्या नावावर कंपनीचे 15 लाख शेअर्स आहेत. या शेअर्सची किंमती 240 कोटी रुपये आहे. त्यामुळं नारायण मूर्ती यांचा नातू देशातील सर्वात तरुण करोडपती बनला आहे. Infosys कंपनीने एकाग्र मूर्तीच्या नावावर 15 लाख शेअर्स केले आहेत. यामुळं एकाग्र मुर्ती हा घरातील लहान सदस्य Infosys कंपनीचा हिस्सेदार झाला आहे. त्याचा या कंपनीत 0.04 टक्के हिस्सा झाला आहे.
सुधा मूर्ती यांचा इन्फोसिसमध्ये 0.93 टक्के हिस्सा
दरम्यान, कंपनीचा 0.04 टक्के हिस्सा एकाग्र मूर्तीच्या नावावर केल्यानंतर नारायण मूर्ती यांच्याकडे 0.36 टक्के हिस्सा शिल्लक आहे. त्यांच्याकडे कंपनीचे अद्याप 1.51 कोटी शेअर्स शिल्लक आहेत. नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांचा इन्फोसिसमध्ये 0.93 टक्के हिस्सा आहे. सुधा मूर्ती यांच्याकडे 3,45,50,626 इन्फोसिस स्टॉक्स आहेत. देशातील बड्या उद्योगपतीपैंकी त्या एक आहेत. नुकतीचं त्यांनी राजकीय क्षेत्रात देखील पदार्पण केलंय. त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं आहे.
अक्षता मुर्ती यांची कंपनीत 1.05 टक्के हिस्सेदारी
नारायण मूर्ती आणि सुधा मुर्ती यांची मुलगी अक्षता मुर्ती यांच्या नावावर देखील इन्फोसिसमध्ये मोठी हिस्सेदारी आहे. त्यांची या कंपनीत 1.05 टक्के हिस्सेदारी आहे. म्हणजे त्यांच्या नावावर कंपनीचे 38957096 शेअर्स आहेत. महत्वाचं म्हणजे अक्षता मुर्ती या ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी आहेत.
रोहन मुर्ती यांची कंपनीत सर्वात मोठी हिस्सेदारी
नारायण मूर्ती आणि सुधा मुर्ती यांचा मुलगा रोहन मुर्ती यांची कंपनीत सर्वात मोठी हिस्सेदारी आहे. रोहन यांची कंपनीत 1.64 टक्के हिस्सेदारी आहे. त्याच्याजवळ कंपनीचे 6,08,12, 892 शेअर्स आहेत. सध्या रोहन मुर्ती हे लंडनमध्ये राहत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Narayan Murthy : नारायण मूर्ती आजही आठवड्यातून 70 तास काम करतात; ते कॉर्पोरेट गांधी, पण मी कस्तुरबा नाही; नेमक्या काय म्हणाल्या सुधा मूर्ती?