World Richest Family : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दोन नावं आघाडीवर आहेत. ती म्हणजे उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh ambani) आणि गौतम अदानी (Gautam Adani). मात्र, जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब कोणतं? याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? एक असं कुटुंब ज्या कुटुंबाची संपत्ती ही मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यापेक्षी कितीतरी जास्त आहे. हे कुटुंब एलन मस्कपेक्षाही खूप श्रीमंत आहे.
नाहयान रॉयल फॅमिली सर्वात श्रीमंत
अहमदाबादमध्ये येते नुकतील 'व्हायब्रंट गुजरात समिट-2024' संपन्न झाली. ज्यामध्ये संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान (Mohammed bin Zayed Al Nahyan) हे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विशेष अतिथी म्हणून सहभागी झाले होते. अहमदाबादमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत रोड शोही केला. त्यांचे 'नाहयान रॉयल फॅमिली' ( Nahyan Royal Family) हे जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे.
नाहयान कुटुंबाची एकूण मालमत्ता किती?
अबुधाबीच्या अमिरातीचे राजघराणे म्हणजेच ‘नाहयान फॅमिली’ 2023 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब बनले. त्याने या प्रकरणात वॉलमार्ट इंकचे मालक वॉल्टन कुटुंबालाही मागे सोडले. UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान हे सध्या या कुटुंबाचे प्रमुख आहेत. त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 305 अब्ज डॉलर्स (सुमारे 25.38 लाख कोटी रुपये) आहे. तर वॉल्टन कुटुंबाची एकूण संपत्ती 232.2 अब्ज डॉलर्स (सुमारे 19.31 लाख कोटी रुपये) आहे.
एलन मस्कपेक्षाही जास्त संपत्ती
वैयक्तिकरित्या, टेस्लाचे संस्थापक एलन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. पण एकूण निव्वळ संपत्ती बघितली तर एलन मस्कची संपत्ती नाहयान कुटुंबाच्या तुलनेत कुठेही नाही. एलन मस्क यांची संपत्ती 222 अब्ज डॉलर (सुमारे 18.46 लाख कोटी रुपये) आहे.
अंबानी-अदानींच्या एकूण संपत्तीपेक्षा जास्त
नाहयान रॉयल फॅमिलीची संपत्ती इतकी आहे की, ती भारतातील दोन सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या एकूण संपत्तीच्या कितीतरी पटीने जास्त आहे. मुकेश अंबानी कुटुंबाची संपत्ती 101 अब्ज डॉलर (सुमारे 8.4 लाख कोटी रुपये) आहे आणि गौतम अदानी कुटुंबाची संपत्ती 91.8 अब्ज डॉलर (सुमारे 7.63 लाख कोटी रुपये) आहे. अशाप्रकारे दोघांची एकूण संपत्ती केवळ 16 लाख कोटी रुपये आहे. या दोघांच्या संपत्तीपेक्षा कितीतरी जास्त संपत्ती ही नाहयान रॉयल फॅमिलीची आहे.
महत्त्वाच्या बातम्या: