LIC IPO News: भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC) आयपीओ आजपासून अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आहे. रिटेल गुंतवणूकदारांसाठी एलआयसीचा आयपीओ 4 मे ते 9 मे दरम्यान खुला होणार आहे. आयपीओमध्ये कंपनीने प्रति शेअर 902 रुपये ते 949 रुपये इतकी किंमत निश्चित केली आहे. ग्रे बाजारात  एलआयसीच्या आयपीओची जोरदार चर्चा आहे. ग्रे मार्केटमध्ये एलआयसीच्या आयपीओ दर 90 रुपये झाला आहे. यानुसार, एलआयसीची शेअर बाजारात 10 टक्के प्रीमियम दराने लिस्टिंग होण्याची शक्यता आहे. 


GMP मध्ये सातत्याने वाढ


LIC IPO च्या जीएमपीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी ग्रे मार्केट प्राइज (GMP) 45 रुपये होती. तर, आज GMP 70 रुपयांपासून सुरू झाला आणि 90 रुपयांवर पोहचला.  23 एप्रिल रोजी GMP 15 रुपये होता. एलआयसी आयपीओची GMP 23 एप्रिलपासून आतापर्यंत 6 पटीने वाढला आहे. 


किती रुपयांना होऊ शकतो लिस्ट?


एलआयसी आयपीओची GMP 90 रुपये सुरू आहे. त्यानुसारस एलआयसीचा शेअर 1039 रुपयांवर ( 949+90=1039 रुपये) लिस्ट होण्याचा अंदाज आहे. यानुसार एलआयसीचा आयपीओ 10 टक्क्यांच्या प्रीमियमसह लाँच होऊ शकतो. 4 मे रोजी आयपीओ खुला होण्याआधी GMP मध्ये बदल होऊ शकतो. 


एलआयसी शेअर बाजारात 17 मेपर्यंत लिस्ट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर यामध्ये ट्रेडिंग सुरू होईल. एलआयसीच्या आयपीओत प्रति शेअर 902 रुपये ते 949 रुपये प्रति शेअर इतकी किंमत ठरवण्यात आली आहे. आयपीओच्या एका लॉटमध्ये 15 शेअर असणार आहेत.  केंद्र सरकार एलआयसीचा 3.5 टक्के हिस्सा बाजारात विक्री करणार असून त्या माध्यमातून 21 हजार कोटी रुपये उभा करणार आहे. एलआयसीच्या पॉलिसीधारकांना आयपीओ किंमतीवर प्रति समभाग 60 रुपये किंवा 6 टक्क्यांची सूट मिळणार आहे. तर, कर्मचारी, रिटेल गुंतवणूकदारांना प्रति समभाग जवळपास ५ टक्के किंवा ४५ रुपयांची सवलत मिळणार आहे.  







(Disclaimer:  ही बातमी केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करताना आर्थिक सल्लागार, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. गुंतवणुकीसाठी आम्ही सल्ला देत नसून तुमच्या आर्थिक नुकसानीसाठी ABPLive.Com जबाबदार राहणार नाही)