नवी दिल्ली : जागतिक बाजारातील अनिश्चिचतेच्या काळात भारतीय गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडवरील विश्वास कायम ठेवला आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडस इन इंडियाकडून जून महिन्याची आकडेवारी जाहीर केली आहे. जून महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये 23568 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. मे महिन्यात ही रक्कम 18994 कोटी रुपयांवर होती. म्युच्युअल फंडच्या असेट अंडर मॅनेजमेंटची रक्कम वाढून 74.5 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. गोल्ड ईटीएफमधील गुंतवणुकीमध्ये मोठी वाढ झाली आहे.

AMFI च्या आकडेवारीनुसार म्युच्युअल फंड असेट अंडर मॅनेजमेंटची रक्कम 75 लाख कोटींच्या जवळ पोहोचली आहे. जूनमध्ये 49000 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. मे महिन्यात ही रक्कम 29 हजार कोटींवर होती. जून महिन्यापर्यंत असेट अंडर म्युच्युअल फंडची रक्कम 74.4 लाख कोटींवर पोहोचली आहे.

AMFI च्या आकडेवारीनुसार म्युच्युअल फंडस योजनांमधील गुंतवणूक सलग 52 व्या महिन्यात वाढली आहे. यावरुन गुंतवणूकदारांचा विश्वास दिसून येतो. आकडेवारीनुसार इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये जून महिन्यातील गुंतवणूक 23587 कोटी रुपये आहे. मे महिन्यात ही रक्कम 19013 कोटी रुपये इतकी होती. पाच महिन्यांच्या घसरणीनंतर इक्विटी फंडमध्ये गुंतवणक वाढली आहे.

AMFI च्या डेटावर टाटा असेट मॅनेजमेंटच्या चीफ बिझनेस ऑफिसर आनंद वरदराजन यांच्यामते म्युच्युअल फंड असेट अंड मॅनेजमेंटची रक्कम 75 लाख कोटींच्या जवळ पोहोचणं ही मोठी बातमी आहे. जून महिन्यात ही रक्कम 74.5 लाख कोटींवर पोहोचली आहे. जून महिन्यात इक्विटी म्युच्युअल गुंतवणूक 5000 कोटी रुपयांनी वाढली आहे.

वरदराजन यांच्या मते फ्लेक्सी कॅप फंडसमध्ये सर्वाधिक 5733 कोटी रुपयांची गुंतवणूक जून महिन्यात झाली आहे. मिड कॅप आणि स्मॉल कॅपच्या तुलनेत गुंतवणूकदार फ्लेक्सी कॅप फंडला प्राधान्य देत आहेत.

गोल्ड ईटीएफमध्ये 2000 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. यावरुन गुंतवणूकदार सोन्याच्या कामगिरीच्या आधारे नफा कमावण्यासाठी आणि पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतं.

दरम्यान, ईएलएसएस मधून गुंतवणूकदार बाहेर पडत असल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. ईएलएसएसमध्ये 556 कोटींचा आऊट फ्लो पाहायला मिळाला. तर जून महिन्यात सर्वाधिक गुंतवणूक फ्लेक्सी कॅप फंडमध्ये 5733 कोटी रुपये इतकी झाली.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)