Bobby Darling News: अभिनेत्री बॉबी डार्लिंग (Bobby Darling) सध्या चर्चेत आहे. तिनं तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केलेत. बॉबी डार्लिंगनं तिच्या आईच्या मृत्यूबद्दलही सांगितलंय. माझ्या आईच्या मृत्यूला मीच जबाबदार असल्याचं बॉबी डार्लिंगनं सांगितलं आहे. तसेच, पुढे बोलताना बॉबी डार्लिंगनं तिच्या मनातल्या दुःखाला वाट मोकळी करुन दिली. मी जगाला तोंड देतेय, मी एकटीच लढतेय, मी काय करावं? देवानं मला असं का बनवलंय? असंही बॉबी डार्लिंग म्हणाली.
काही दिवसांपूर्वी बॉबी डार्लिंगनं सिद्धार्थ कन्ननला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना बॉबी डार्लिंगच्या आईचा विषय आला, त्यावेळी मात्र ती ढसाढसा रडू लागली. ती म्हणाली की, "माफ करा आई, मी काय करू शकते? कोणीही समजू शकलं नाही. तुलाही समजलं नाही... तू काय करू शकतेस? तू वरच्या मजल्यावर गेलीस. मी इथेच राहिले. मी जगाला तोंड देतेय. मी एकटीच लढतेय. मी काय करावं? देवानं मला असं का बनवलं? ही माझी चूक नाही..."
मी माझ्या आईचे दागिने विकलेले : बॉबी डार्लिंग
बॉबी डार्लिंग मुलाखतीत बोलताना ढसाढसा रडू लागली आणि पुढे बोलताना म्हणाली की, "मला खूप वाईट वाटतंय. मलाही अपराधी वाटतंय की, माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार आहे... मी जबाबदार आहे... आई, प्लीज, मी माझ्या आईचे दागिने चोरले आणि घरातून पळून गेले. मी ते चांदणी चौकात विकलेत... मला दागिने कसे विकायचे, हे माहीत नव्हतं... ते माझ्या आईच्या लग्नाचे दागिने होते, मी ते विकले... मला 30,000 रुपये मिळालेले. मी परदेशातून परत आल्यावर पप्पांनी मला सांगितलं की, तुझ्या आईच्या तोंडून निघालेलं की, तुझा सर्वनाश होऊन जाऊ देत... पप्पांनी आईला समजावलेलं की, शाप देऊ नकोस, पण आईच्या तोंडून आधीच निघालेलं की, मी बर्बाद व्हायला हवं आणि पाहा मी झालेय.
बॉबी डार्लिंग पुढे बोलताना म्हणाली की, "त्यानंतर मी हॉन्गकॉन्गला निघून गेले. मी तिथून आईला फोन केलेला आणि तिला म्हणालेले की, मम्मी मी ठीक आहे. मला तुझी खूप आठवण येतेय. मी तुझा मार आणि तुझ्या हातचं जेवण खूप मिस करतेय. मम्मी दुःखात होती. तिची किडनी डॅमेज झालेली. माझी आई, माझा विचार करत, काळजी करत देवाघरी निघून गेली. मीच माझ्या आईच्या मृत्यूला जबाबदार आहे. मीच तिला मारलंय. आई मला माफ कर... मी दररोज मरतेय... मला रात्री झोप लागत नाही... मला माफ कर... मी माझ्या वडिलांच्या जास्त जवळ नव्हते, मला त्यांचा फार राग यायचा..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :