मुंबई :  मुंबईत घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. त्यातील बऱ्याच जणांनी हे स्वप्न पूर्ण केलंय. गेल्या दहा दिवसात एक लाखाहून अधिक नागरिकांनी मुंबईत घर (House In Mumbai) घेतलंय. फक्त रिअल इस्टेटमध्येच (Real Estate)  ही तेजी नाही. तर वाहन क्षेत्र, सोनं खरेदी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीतही अशीच वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. रिअल इस्टेटपासून ते सोनं खरेदीपर्यंतच्या (Gold Purchase)  व्यावसायांना अच्छे दिन आले आहेत.  


मुंबईत घरांच्या अव्वाच्या सव्वा किंमती बघायला मिळतात. मात्र, मागील 10 महिन्यात मुंबईत एक लाखांहून अधिक घरांची विक्री झाली आहे. सोबतच, दसऱ्याचा विचार केला तर यात वृद्धीत होत मागील वर्षाच्या तुलनेत 37 टक्क्यांची वाढ झाली आहे. येत्या दिवाळीत देखील आणखी घरांची विक्री होण्याची शक्यता असून राज्य सरकारला त्या माध्यमातून मोठा कर मिळण्याचा अंदाज क्रेडाई-एमसीएचआयनं व्यक्त केला आहे.  



  • मुंबईत मागील 10  महिन्यात 1 लाख 4 हजार 852 घरांची विक्री 

  • राज्य सरकारच्या तिजोरीत 9 हजार 221 कोटी रुपये जमा 

  • मागील 9 दिवसात मुंबईत दसऱ्यात 4 हजार 594 घरांची विक्री 

  • मागील वर्षी 2022 मध्ये दसऱ्यात 3 हजार 343 घरांची विक्री 

  • यंदाच्या वर्षात घरांच्या नोंदणीत सुमारे 37 टक्क्यांची वाढ 

  • मागील 10 दिवसात राज्य सरकारच्या  तिजोरीत घरांच्या विक्रीतून 435 कोटी  रुपयांचा कर जमा 

  • मागील 10 दिवसात सरासरी दररोज 510 घरांची विक्री 

  • नवी मुंबईत मागील 10 दिवसात  4 हजार 500 घरांची नोंद 

  • नवी मुंबईतील घरांच्या नोंदणीतून राज्य सरकारच्या तिजोरीत 270कोटी रुपयांचा महसूल


फक्त रिअल इस्टेट व्यावसायालाच भरभराटी आलेली नाही तर सोन्याच्या खरेदीलाही अशीच झळाळी आली आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मुंबईत 120 टन सोनं खरेदी झाली आहे. राज्यात 700  कोटींच्या जवळपास उलाढाल झाली आहे. 



  • गेल्या वर्षीच्या तुलनेत  तिसऱ्या तिमाहीत सोन्याची  7 टक्के अधिक आयात 

  • दसऱ्याला 120  टन सोन्याची उलाढाल 

  • 700 ते 750 कोटींची उलाढाल 

  • दिवाळीदरम्यान  साधारण 300 टन सोन्याची विक्री होण्याचा अंदाज 

  • सोनं 64 हजारांवर जाण्याची शक्यता


जे चित्र सोनं बाजारात आहे. तेच चित्र इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये पाहायला मिळतंय. दसऱ्याला इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीत मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळालं. दिवाळीत खरेदीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.तर वाहन खरेदीतही अशीच तेजी पहायला मिळतेय. एकूणच काय तर रिअल इस्टेट, वाहन क्षेत्र, सोनं व्यापाराला अच्छे दिन आलेत.


हे ही वाचा :


सरकारच्या पाठिंब्याशिवाय हिरे व्यापाऱ्यांचं मोठं पाऊल, गुजरातमध्ये उभारलं जगातील सर्वात मोठं हिरे व्यवसाय केंद्र