Mukesh Ambani Richest Man Of India : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी गौतम अदानी (Gautam Adani) यांना मागे टाकले आहे. मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (Richest Man Of India) बनले आहेत. शेअर बाजारातील 'धोबीपछाड'मुळे अदानींना मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. यामुळे अंबानींना फायदा झाला असून ते पुन्हा 'नंबर वन'वर पोहोचले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक (Reliance Owner) मुकेश अंबानी (Mukesh Ambani Networth)आता गौतम अदानींना (Gautam Adani Networth) मागे टाकत भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. 


अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती


फोर्ब्स श्रीमंतांच्या यादीनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 84.3 ब्ज डॉलर झाली आहे. दरम्यान, गौतम अदानी यांच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झाली आहे, परिणामी अदानी यांच्या संपत्तीत घट झाली आहे. शेअर मार्केटमधील पडझडीमुळे गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 83.9 अब्ज डॉलर इतकी घसरली आहे. फोर्ब्सनुसार, गौतम अदानी आता श्रीमंतांच्या यादीत 10 व्या क्रमांकावर आहेत, तर अंबानी नवव्या क्रमांकांवर आहेत. 


गौतम अदानी यांच्या शेअर्समध्ये मोठी पडझड


यामुळे आता भारतातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर आहेत, तर गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. रिपोर्टनुसार, अदानी समुहाला मागील 24 तासांत मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. गौतम अदानी यांना गेल्या 24 तासांत सुमारे 10 अब्ज डॉलरचे नुकसान झालं आहे.


जगातील टॉप 10 श्रीमंतांची यादी


फोर्ब्सनुसार, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली आहे. यानुसार, लक्झरी ब्रँड लुई व्हिटनचे मालक (Louis Vuitton) बर्नार्ड अर्नाल्ट (Bernard Arnault) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. 214 अब्ज डॉलर संपत्तीसह ते श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर टेस्ला आणि ट्विटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) आहेत. मस्क यांची एकूण संपत्ती 178.3 अब्ज डॉलर (Elon Musk Networth) आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर ॲमेझॉनचे मालक (Amazon) जेफ बेजोस (Jeff Bezos) आहेत. त्यांची एकूण संपत्ती 126.3 अब्ज डॉलर आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Mukesh Ambani : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक, मुकेश अंबानी दर महिन्याला भरतात 'इतकं' वीज बिल; किंमत पाहून बसेल धक्का!