Mukesh Ambani House Electricity Bill : भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी त्यांच्या कुटुंबासह मुंबईतील त्यांच्या आलिशान घर अँटिलियामध्ये राहतात. 27 मजली अँटिलिया हे जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे. तुम्ही कधी विचार केला आहे की, मुकेश अंबानींच्या 27 मजली आलिशान अँटिलिया घराचे वीज बिल किती असेल?


Mukesh Ambani House Antilia Electricity Bill :  आलिशान अँटिलिया घराचे वीज बिल किती?


मुकेश अंबानी यांच्या आलिशान अँटिलिया घराचे वीज बिल पाहून तुमचे डोळे विस्फारतील. मोलमजुरी करुन हातावर पोट भरणारा एखादा सर्वसामान्य माणूस त्याच्या संपूर्ण आयुष्यातही एवढं वीज बिल भरणार नाही जेवढं उद्योगपती मुकेश अंबानी एका महिन्याला भरतात. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराचे एका महिन्याचे वीज बिल 70 लाख आहे.


AC in Antilia Parking : अँटिलिया घराच्या पार्किंगमध्येही वातानुकूलित सुविधा


एका रिपोर्टनुसार, मुकेश अंबानींच्या आलिशान अँटिलियामध्ये एका महिन्याला सुमारे 6,37,240 युनिट्स इतका विजेचा वापर होतो. त्यामुळे उद्योगपती मुकेश अंबानी दर महिन्याला सुमारे 70 लाख रुपये वीज बिल भरतात. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराच्या पार्किंगमध्येही वातानुकूलित व्यवस्था आहे. 


India's Second Richest Mukesh Ambani : मुकेश अंबानी भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती


फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार, उद्योगपती गौतम अदानी भारतातील पहिले श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर जगातील श्रीमंताच्या यादीत मुकेश अंबानी आठव्या क्रमांकावर आहेत. त्यांची गणना जगातील टॉप 10 श्रीमंत व्यक्तींमध्ये केली जाते. मुकेश अंबानी यांची श्रीमंती पाहता त्यांची लाईफस्टाईलही तितकीच चैनीची आहे.


Mukesh Ambani Networth : मुकेश अंबानी यांची संपत्ती


रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 94 अब्ज डॉलर (7.55 ट्रिलियन रुपये) आहे. मुकेश अंबानी यांना एकापेक्षा एक महागड्या वस्तूंचा शौक आहे. मुकेश अंबानी यांच्याकडे एकापेक्षा जास्त आलिशान कार आणि आलिशान मालमत्ता आहेत. मुकेश अंबानी यांचे मुंबईतील अँटिलिया हे घर जगभरात प्रसिद्ध आहे. दरम्यान, अंबानी यांच्या घराच्या वीज बिलाबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. एका मीडिया रिपोर्टनुसार, अँटिलियाचे एका महिन्याचे भाडे सुमारे 70 लाख असल्याचा दावा करण्यात आला आहे.