RBI 2000 Rs Note: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या परतीची प्रक्रियाही देशातील सर्व बँकांमध्ये सुरू झाली आहे. आरबीआयच्या वार्षिक अहवालात 500 रुपयांच्या नोटांबाबतही मोठी (Rs 500) माहिती समोर आली आहे. 2000 रुपयांच्या नोटा (Rs 2000 note) बदलण्यासाठी दिलेली 30 सप्टेंबरची मुदत संपण्यापूर्वीच 500 रुपयांच्या नोटांशी संबंधित ही अडचण रिझर्व्ह बँकेसमोर आली आहे. 


2000 रुपयांची नोटा बंद झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेसमोरील आव्हाने वाढण्याची शक्यता आहे. आरबीआयच्या अहवालानुसार, 500 रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण (Fake Currency) वाढत चालले आहे. वर्ष 2022-23 मध्ये 500 रुपयांच्या सुमारे 91 हजार 110 बनावट नोटा पकडण्यात आल्या. वर्ष 2021-22 च्या तुलनेत याचे प्रमाण 14.6 टक्क्यांनी जास्त आहे. 2020-21 मध्ये 500 रुपयांच्या 39,453 बनावट नोटा पकडण्यात आल्या. तर 2021-22 मध्ये 76 हजार 669 किमतीच्या बनावट नोटा पकडण्यात आल्या.


2000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या घटली 


500 रुपयांप्रमाणे 2000 रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या आहेत. मात्र, 2000 रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण घटले आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात 2000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 28 टक्क्यांनी घटून 9 हजार 806 नोटांवर आली आहे. 500 आणि 2 हजार रुपयांच्या नोटांशिवाय 100, 50, 20, 10 रुपयांच्या बनावट नोटाही पकडण्यात आल्या आहेत. 


आरबीआयच्या अहवालानुसार, बँकिंग क्षेत्रात एकूण 2 लाख 25 हजार 769 बनावट नोटा पकडल्या गेल्या होत्या, तर गेल्या वर्षी 2 लाख 30 हजार 971 च्या बनावट नोटा सापडल्या होत्या. 


20 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या वाढली 


500 रुपयांशिवाय 20 रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाणही वाढले आहे. 2022-23 मध्ये 20 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 8.4 टक्के वाढ झाली आहे. 10 रुपयांच्या बनावट नोटांच्या संख्येत 11.6 टक्क्यांनी घट झाली आहे, तर 100 रुपयांच्या बनावट नोटांच्या संख्येत 14.7 टक्क्यांनी घट झाली आहे. 



बनावट नोटांव्यतिरिक्त आरबीआयने आपल्या वार्षिक अहवालात नोटांच्या छपाईबाबतही संपूर्ण माहिती दिली आहे. आरबीआयने 2022-23 मध्ये नोटांच्या छपाईसाठी एकूण 4 हजार 682.80 कोटी रुपये खर्च केले होते. 2021-22 मध्ये छपाईचा खर्च 4 हजार 984.80 कोटी रुपये होता. 


10 आणि 500 रुपयांच्या नोटा चलनात सर्वाधिक


बाजारात 10 आणि 500 रुपयांच्या नोटांचे प्रमाण सर्वाधिक आहे. 31 मार्च 2023 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण चलनापैकी 37.39 टक्के वाटा हा 500 रुपयांच्या नोटांचा आहे. त्यानंतर 10 रुपयांच्या नोटांचा वाटा आहे. बाजारात 19.2 टक्के नोटा या 10 रुपयांच्या आहेत. त्यामुळे आता बाजारातून 500 रुपयांच्या बनावट नोट चलनातून बाहेर काढण्याचे मोठं आव्हान आरबीआयसमोर आहे. 


इतर महत्त्वाची बातमी: