Modi Goverment : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पदभार स्वीकारून आता जवळपास 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात भारताने मोबाईल उत्पादनात प्रचंड प्रगती साधली आहे. याबाबतीत आपण चीनला सतत आव्हान देत आहोत. नीती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांनी या संदर्भात अनेकवेळा माहिती दिली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मेक इन इंडिया' कार्यक्रम कितपत यशस्वी झाला आहे हे,  जर तुम्हाला पाहायचे असेल तर देशात तयार होणाऱ्या मोबाईल फोनचे आकडे पाहणं गरजेचं आहे.


मोबाईल निर्यातीत भारताचे  चीनला आव्हान 


भारत गेल्या 10 वर्षात केवळ मोबाईल निर्मितीचे केंद्र बनला नाही. तर  किंबहुना आता निर्यातीच्या बाबतीतही चीनला आव्हान देत आहे. NITI आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांनी यासंबंधीची माहिती सांगितली आहे. अमिताभ कांत यांचे भारत सरकारचे पर्यटन, स्टार्टअप इंडिया आणि मेक इन इंडिया यांसारखे 'इनक्रेडिबल इंडिया' असे अनेक कार्यक्रम यशस्वी करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.


2023 मध्ये 27 कोटी मोबाईल हँडसेट तयार 


अमिताभ कांत यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2023 मध्ये भारतीय बाजारपेठेत विकले गेलेले सर्व फोन पूर्णपणे देशात तयार झाले आहेत. 2022 मध्ये हा आकडा 98 टक्के होता. भारत 2023 मध्ये 27 कोटी मोबाईल हँडसेट तयार केले, तर 2014 मध्ये भारताने 81 टक्के मोबाईल फोन चीनमधून आयात केले होते.


जगातील दुसरी सर्वात मोठी मोबाईल उत्पादक


भारत आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाईल उत्पादन करणारा देश आहे. यामुळे तो चीनला सातत्याने आव्हान देत आहे. एवढेच नाही तर भारताने 2014 ते 2022 पर्यंत 2 अब्ज मोबाईल हँडसेटचे उत्पादन केले आहे. भारतात उत्पादित होणारे सुमारे 20 टक्के मोबाईल हँडसेट इतर देशांमध्ये निर्यात केले जातात. 2014 ते 2022 दरम्यान भारतातील मोबाईल उत्पादन 23 टक्के वार्षिक वाढ दराने वाढण्याची अपेक्षा आहे.


भारतात आयफोनचे उत्पादन सुरू


Xiaomi, Oppo, Vivo सारख्या ब्रँडचे असेंब्ली आणि उत्पादन भारतात आधीच होत आहे. अलीकडे Apple ने भारतात आयफोनचे उत्पादन सुरू केले आहे. इतकंच नाही तर आयफोन व्यतिरिक्त अॅपल आपल्या इतर उपकरणांचे उत्पादन भारतात हस्तांतरित करण्याचा विचार करत आहे. भारत सरकारने PLI योजना देखील सुरू केली आहे, ज्यामुळं आगामी काळात भारत मोबाईल उत्पादनात एक मोठा केंद्र बनणार आहे. मोदी सरकारचा प्रताप, भारतात बनवलेले मोबाईल प्रत्येक भारतीयाच्या हातात पोहोचले, चीनला असेच आव्हान मिळत आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारून आता जवळपास 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात भारताने मोबाईल उत्पादनात प्रचंड प्रगती साधली आहे. आता आपण चीनला सतत आव्हान देत आहोत. 


महत्त्वाच्या बातम्या:


Cheapest Foldable Smartphone : सॅमसंगचा सर्वात स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन, किंमत आणि खासियत काय असेल?